Prashant Kishor celebrates victory after defeating BJP in Bankipur bypoll, marking a major political shift in Bihar. saam tv
देश विदेश

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा बालेकिल्ला ढासळला; दोन पराभव पचवलेल्या प्रशांत किशोर यांचा करिश्मा

Prashant Kishor Bankipur Bypoll Victory Analysis Bihar: बिहारमधील बहुचर्चित अशा बांकीपूर पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर विजयी झालेत... यापुढे बिहारच्या सत्ताकारणात प्रशांत किशोर यांच्या रुपानं भाजपला शह मिळणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत खातंही न उघडणारा जनसुराज पक्ष आगामी काळात बिहारी जनतेचा आवाज बनणार का? पाहूयात यावरचा हा खास रिपोर्ट...

Rohit Kadam

बिहारच्या बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपला धूळ चारत जन सुराज पार्टीचे संस्थापक आणि उमेदवार प्रशांत किशोर विजयी झाले. प्रशांत किशोर यांनी भाजपच्या नीरज कुमार यांचा 19 हजारांहून अधिक मतांनी पराभव केलाय. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ भाजपकडे असलेला हा मतदारसंघ किशोर यांनी खेचून आणलाय. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय. बिहारच्या जनतेनं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला स्पष्ट संदेश दिल्याचं या विजयानंतर किशोर यांनी म्हटलंय.

दरम्यान, बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपविरोधात प्रशांत किशोर यांचा विजय अत्यंत महत्त्वपूर्ण का मानला जातोय, तेही पाहा...

प्रशांत किशोर यांचा विजय महत्त्वाचा का?

1995 पासून बांकीपूर हा भाजपचा बालेकिल्ला

बांकीपूर हा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन 2 दशकांपासूनचा मतदारसंघ

जदयूचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नीतीश कुमार बिहारच्या विधीमंडळ राजकरणातून बाहेर गेल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक

तसंच, नीट पेपरफुटीविरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर या पोटनिवडणुकीसाठी मतदान

त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधातला हा रोष आहे का? अशी चर्चा

आता रंगलीय. किशोर यांच्या विजयामागे नेमकी कोणती कारण आहेत...पाहूयात...

प्रशांत किशोर यांच्या विजयाची कारणं?

भाजप राष्ट्रीय अध्यक्षांचा बालेकिल्ला असूनही बांकीपुरमध्ये ऐनवेळी उमेदवार बदलण्याची वेळ भाजपवर आली

बिहारमधील लाखो तरुण स्पर्धा परिक्षांची तयारी करत असल्यामुळे दिल्लीतील आंदोलनानंतर त्यांचा केंद्र सरकारवरचा रोष वाढला...

प्रशांत किशोर यांना बिहारमधील 3 हजार किमी पदयात्रा केल्यानं जनतेशी थेट संवादाचा फायदा

आरजेडी, जेडीयू आणि भाजपनं दुर्लक्षित केलेल्या तरुणांच्या मुद्द्यांवर किशोर यांचा भर

प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला गेल्या विधानसभा निवडणुकीत एक जागा जिंकता आली नव्हती. विशेष म्हणजे किशोर निव़डणुकीच्या मैदानात नव्हते. मात्र नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत थेट बालेकिल्लातच भाजपला प्रशांत यांनी आव्हान दिलं. आणि ते निवडून आले. आता प्रशांत किशोर यांच्याकडे भविष्यातला विरोधातला नवा आवाज म्हणून पाहिलं जातंय. त्यांच्या विधानसभेतल्या एण्ट्रीमुळे भाजप, जेडीयू की आरजेडी नेमकं कुणासमोरचं आव्हान वाढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चारित्र्याच्या संशयावरून नराधम पतीची पत्नीला बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, दोन मुलांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं

Maharashtra News Live Update: सलगच्या सुट्ट्यांचा परिणाम! रायगडचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले

Downhill driving tips: उताराच्या रस्त्यावर कार न्यूट्रलवर चालवल्याने पेट्रोलची बचत होते?

बिल्डरने फसवणूक केली तर खैर नाही! पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; नवी नियमावली लागू; वाचा काय बदलले?

Diabetes Walking: डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी रोज किती चालावं? जाणून घ्या योग्य वॉकिंग टार्गेट

SCROLL FOR NEXT