aap politics Saam tv
देश विदेश

ठाकरे गटानंतर आणखी एक पक्ष फुटणार? हळूहळू सगळा पक्ष संपून जाणार; ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

aap politics : ठाकरे गटानंतर आणखी एक पक्ष फुटणार असल्याचा दावा ज्येष्ठ नेते प्रशांत भुषण यांनी केला आहे. प्रशांत भूषण यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

ठाकरे गटानंतर आम आदमी पक्ष फुटणार असल्याचा दावा

आम आदमी पक्ष संपणार असल्याचा दावा प्रशांत भूषण यांनी केलाय

प्रशांत भूषण यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

आम आदमी पक्षाचे माजी नेते, सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षावर मोठं भाष्य केलं आहे. माजी मुख्यमंत्र्यांचा पक्ष हळूहळू संपून जाईल, अशी भविष्यवाणी प्रशांत भूषण यांनी केली.

राघव चढ्ढा यांच्यासहित ७ राज्यसभा खासदारांच्या फुटीवरून आपचे संस्थापक सदस्य राहिलेल्या प्रशांत भूषण यांनी भाष्य केलं. प्रशांत भूषण यांनी म्हटलं की, 'राज्यसभेचं तिकीट पैसे घेऊन वाटलं. भाजपने नेमकी त्या खासदारांची कुमकुवत बाजू ओळखली'.

प्रशांत भूषण यांनी एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी अरविंद केजरीवाल आणि अन्ना हजारे यांच्यावर भाष्य केलं. 'अरविंद केजरीवाल यांनी पक्षाची धोरणे कमकुवत केली आहेत. पक्षातील नेत्यांवर खोटे आरोप करून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला, असा आरोप प्रशांत भूषण यांनी केला. तिकीट वाटपात गोंधळ झाला, त्यामुळे पक्षात वादाला तोंड फुटल्याचाही आरोप त्यांनी केला.

भूषण यांनी पुढे म्हटलं की, आम आदमी पक्ष हा सर्वसामान्य स्वयंसेवकामुळे तयार झाला आहे. खरंतर अरविंद केजरीवाल यांनी स्वत:च्या पक्षातील नेत्यांची बदनामी करायला सुरुवात केली होती. त्यावेळी 'आपण भाजपमध्ये सामील होऊ', असा संदेश एका नेत्याच्या नावाने पसरवण्यात आला. त्यानंतर त्या नेत्याला देशद्रोही ठरवून पक्षातून निलंबित करण्यात आलं'.

'मी अरविंद केजरीवाल यांना चौकशी करण्यास सांगितलं, त्यावेळी आम्ही चौकशी का करावी, असं त्यांनी म्हटलं. आम्ही पोलिसांशी चौकशी केल्यानंतर तो संदेश हा त्यांच्या माणसाने पाठवल्याचे उघड झालं. लोकपाल पद हटवलं. त्यांनी 'बी क्लास' राजकीय पक्ष बनवला. मी त्यावेळी एक-दोन उमेदवार वगळता इतर कोणासाठीही प्रचार केला नाही', असे प्रशांत भूषण यांनी सांगितले. 'आम आदमी पक्ष हळूहळू नाहीसा होईल, असं भाष्य प्रशांत भूषण यांनी केलं. त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्ष पुन्हा फुटणार असल्याचेही म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:इंटरनेट वापरणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क

घराच्या उंबरठ्यावर हळद का लावतात? वास्तु शास्त्र काय सांगते?

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! महागाई भत्त्याबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेणार

Warm Water Intake: थंडीच्या दिवसांत कोमट पाणी पिण्याचे चमत्कारिक फायदे, दिवसभरात किती ग्लास पाणी प्यावे?

Gold Rate Today : दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात तेजी! प्रती तोळा इतक्या रुपयांनी महागले सोने; वाचा 24k,22k,18k चे ताजे दर

SCROLL FOR NEXT