Prasanna Saam
देश विदेश

Prasanna Shankar: ‘सेक्स माझी गरज, तुला वेदना झाल्यातरी…’; करोडपती प्रसन्ना शंकरच्या बायकोचा धक्कादायक खुलासा

Prasanna Shankar Divya News: रिपलिंग कंपनीचे सह-संस्थापक प्रसन्न शंकर यांचं वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे. त्यांच्या पत्नी दिव्या शशिधर यांनी घटस्फोटाच्या याचिकेत खळबळजनक आरोप केले आहेत.

Bhagyashree Kamble

काही दिवसांपूर्वी रिपलिंगचे सह-संस्थापक प्रसन्न शंकर वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आले होते. आता त्यांच्या बायकोने खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. प्रसन्न शंकर यांची बायको दिव्या शशिधर यांनी त्यांच्या घटस्फोटाच्या याचिकेत त्यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.

घटस्फोटाच्या याचिकेत दिव्या यांनी पतीकडून शारीरिक संबंध आणि ओपन मॅरेज या गोष्टींसाठी दबाव होत असल्याचा आरोप केला आहे. यासह त्यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. गर्भवती असतानाही प्रसन्न दिव्याकडे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होते, असा आरोप त्यांनी केला आहे.

सॅन फ्रान्सिस्को स्टँडर्डला दिलेल्या मुलाखतीत दिव्याने प्रसन्नवर आरोप करत म्हटलं की, "प्रसन्न म्हणायचे की, माझ्यासाठी सेक्स ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तुला कितीही वेदना झाल्या तरी मला काही फरक पडत नाही. जर तू सहमत नसशील तर, मी जाऊन माझ्या गरजा पूर्ण करेन. तो त्याच्या फोनवरील घाणेरडे फोटो दाखवून मला धमकावत असे".

दिव्याने दावा केला की, "प्रसन्नचे अनेक वेळा इतर महिलांशी संबंध होते. त्याने मला ' ओपन मॅरेज साठी ऑफर दिली आणि नकार दिल्यावर नात्यात अंतर वाढत गेले. प्रसन्न यांचे वेश्यांशीही संबंध होते". असाही आरोप दिव्याने केला आहे.

घटस्फोटाच्या याचिकेत दिव्याने आणखी एक आरोप प्रसन्नवर केला आहे. दिव्याच्या परवानगीशिवाय प्रसन्नने बाथरूम आणि घरातील काही ठिकाणी स्पाय कॅमेरा लावले आहेत. प्रसन्नने बऱ्याचदा दिव्याला ऑफिसमधून रजा घ्यायला भाग पाडले आहे. जेणेकरून तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT