Politics : खा. बाबुल सुप्रियो यांची भाजपला सोडचिट्ठी; तृणमूलमध्ये प्रवेश! SaamTvNews
देश विदेश

Politics : खा. बाबुल सुप्रियो यांची भाजपला सोडचिट्ठी; तृणमूलमध्ये प्रवेश!

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी अखेर भाजपाला सोडचिट्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये शनिवारी अधिकृतरित्या प्रवेश केला आहे.

वृत्तसंस्था

कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील भाजपच्या प्रमुख आणि प्रभावशाली नेत्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी अखेर भाजपाला सोडचिट्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये शनिवारी अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थिती मध्ये त्यांनी तृणमूलची वाट धरली आहे. सुप्रियो हे पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून दोनदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा :

बाबुल सुप्रियो यांनी २०१४ पासून मोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणून विविध विभागांच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ झाली. भाजप नेतृत्वाने अनेक बड्या नेत्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावला होता. रमेश पोखरीयाल, डी.व्ही.सदानंद गौडा, संतोष गंगवार, यांच्यासह सुप्रियो यांना देखील राजीनामा द्यायला सांगण्यात आले होते. तेव्हा "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल आभारी आहे" अश्या आशयाची पोस्ट करून सोशल मीडियावर भावना केली होती. केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी मनातील नाराजी देखील बोलून दाखवली होती.

राजकारणातून संन्यासाची घोषणा :

केंद्रीयमंत्री मंडळातून हटवल्यामुळे बाबूल सुप्रियो भाजपा पक्ष श्रेष्टींवर नाराज झाले होते. ३१ जुलै रोजी ट्विटरद्वारे भूमिका जाहीर करताना त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. यावेळी मंत्रिपदावरून हटवल्यामुळे आणि पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांसोबतच्या मतभेदातून हा निर्णय आपण घेत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नसून इथून पुढे केवळ बंगालच्या जनतेची सेवा करणार असेही सुप्रियो म्हणाले होते.

मात्र, आज तृणमूल मध्ये प्रवेश करून राजकारणात पुन्हा नवीन डाव खेळण्याची तयारी त्यांनी सुरु केलीय, हे मात्र निश्चित.

Edited By : Krushnarav Sathe

हेही वाचा :

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी मुक्कामी आल्यानंतर शेतात रमले

Salim Khan: सलमान खानचे वडिल सलीम खान यांच्यावर केली डीएसए प्रक्रिया; नक्की काय आहे ही प्रोसेस आणि का करतात?

Elvish Yadav-Engaged 2 : महिलेचा टी-शर्ट काढला, आंघोळ घातली अन्...; एल्विश यादवच्या शोमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEOS पाहून नेटकरी भडकले

Latur Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! धाकट्या भावनेचं काढला थोरल्या भावाचा काटा; कारण ऐकून व्हाल थक्क

Accident : भीषण अपघात! ट्रेलरची PCR गाडीला धडक, ५ पोलिसांचा जागीच मृत्यू, ३ जखमी

SCROLL FOR NEXT