Political News Saam TV
देश विदेश

Political News: काँग्रेस पक्षाला हिंदू समाज त्यांची जागा दाखवणार; राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवर भगवंत खूबा यांचं टीकास्त्र

2014 पेक्षा ही 2024 मध्ये त्यांच्या लोकसभेच्या जागा कमी येतील, यात्रा काढून काही फरक पडणार नाही. राहुल गांधी यांचे व्यक्तीमहत्व प्रभावशाली नाही. काँग्रेस पक्ष हा अल्पसंख्याकांवर राजकारण करत आहे, अशी टीका भगवंत खूबा यांनी केली आहे.

Ruchika Jadhav

संजय सूर्यवंशी

BJP Vs Congress:

भारत जोडो यात्रेनंतर आता राहुल गांधी यांनी भारत न्याय यात्रा सुरू केली आहे. या यात्रेवर आता भाजपकडून टीका करण्यात येत आहे.केंद्रीय राज्य मंत्री भगवंत खूबा यांनी देखील या यात्रेवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केलीय.

"देश तोडो यात्रा चालू झाली असून 2014 पेक्षा ही 2024 मध्ये त्यांच्या लोकसभेच्या जागा कमी येतील, यात्रा काढून काही फरक पडणार नाही. राहुल गांधी यांचे व्यक्तीमहत्व प्रभावशाली नाही. काँग्रेस पक्ष हा अल्पसंख्याकांवर राजकारण करत आहे, अशी टीका भगवंत खूबा यांनी केली आहे.

पुढे भगवंत खूबा यांनी म्हटलं की, 22 जानेवारीला राम मंदिराचे आमंत्रण असले तरी काँग्रेस पक्षाने राम मंदिराचे आमंत्रण नाकारले. याचा अर्थ ते नेहरू, इंदिरा गांधी,राजीव गांधी,सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी हे हिंदू विरोधी आहेत. येणाऱ्या लोकसभेत काँग्रेस पक्षाला हिंदू समाज त्यांची जागा दाखवणार, अशा शब्दांत काँग्रेसवर टीकास्त्र सोडलंय.

केंद्रीय राज्य मंत्री भगवंत खुबा नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. कर्नाटक राज्यात लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत. मागच्या वेळेस 28 पैकी 27 जागा भाजपाने जिंकल्या होत्या.आता यावेळेस 28 पैकी 28 जागा भाजपा आणि JDS पार्टीचे उमेदवार जिंकणार असा विश्वास देखील भगवंत खूबा यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT