Former West Bengal Assembly Deputy Speaker and senior TMC leader Ashis Banerjee Saam Tv
देश विदेश

Political News : बड्या नेत्याने संपवलं आयुष्य; पक्षाच्या कार्यालयात आढळला मृतदेह, राजकीय वर्तुळात शोककळा

West Bengal Trunmul Congress Leader Death : पश्चिम बंगालचे माजी विधानसभा उपसभापती आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आशिस बॅनर्जी यांचा बीरभूममधील TMC कार्यालयात मृतदेह आढळला. पोलिसांचा तपास सुरू असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Alisha Khedekar

  • पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ

  • माजी उपसभापती आणि TMCचे ज्येष्ठ नेते आशिस बॅनर्जी यांची आत्महत्या

  • ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली जबाबदारी सांभाळली होती

  • घटनेनंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये शोककळा

पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी उपसभापती आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आशिस बॅनर्जी यांचा रविवारी सकाळी मृतदेह आढळून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बॅनर्जी यांचा मृतदेह कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा प्रकार आत्महत्या आहे की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील इतर बाबींमधून मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

आशिस बॅनर्जी हे पश्चिम बंगालच्या राजकारणातील परिचित नाव होते. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विधानसभेत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असताना त्यांनी विधानसभेच्या उपसभापतीपदाची धुरा सांभाळली होती. बॅनर्जी हे रामपूरहाट विधानसभा मतदारसंघातून तब्बल पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

त्यामुळे बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या राजकारणात त्यांचा प्रभाव होता. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर पक्षातील कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, त्यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून उपलब्ध माहितीच्या आधारे तपास केला जात आहे. या घटनेशी संबंधित सर्व शक्यता तपासल्या जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. त्यानंतरच या घटनेमागील परिस्थितीबाबत अधिक स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बँकेची निवडणूक स्वबळावर लढणार – जयकुमार गोरे

Chinchpokli Travel : विकेंड प्लान अजून झाला नाही? मुलांसोबत चिंचपोकळीजवळील 'या' ५ ठिकाणांची करा सफर

रोज फक्त फळे खाल्ली तर शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Momo Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा गरमागरम आणि चटपटीत मोमोज; वाचा रेसिपी

पोलिस चौकीवर भीषण बॉम्बस्फोट; 11 जणांचा मृत्यू, 30 जखमी

SCROLL FOR NEXT