bjp former mla yashpal benam resign news  Saam tv
देश विदेश

Political News : भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याने तडकाफडकी सोडला पक्ष; राजकीय वर्तुळात खळबळ

Uttarakhand BJP Leader Seatback News : उत्तराखंडमध्ये भाजपला मोठा धक्का! माजी आमदार यशपाल बेनाम यांनी आठ वर्षांनंतर पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षातील नाराजी व्यक्त करत त्यांनी लवकरच मोठी राजकीय घोषणा करण्याचे संकेत दिले.

Alisha Khedekar

  • माजी आमदार यशपाल बेनाम यांनी आठ वर्षांनंतर भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला

  • योग्य जबाबदारी मिळत नसल्याची आणि काही नेत्यांकडून समजून घेतले जात नसल्याची खंत

  • पौडी येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला

उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार आणि पौडी नगरपालिकेचे माजी अध्यक्ष यशपाल बेनाम यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तब्बल आठ वर्षे पक्षात राहिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत लवकरच मोठी घोषणा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे उत्तराखंडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

पौडी येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बेनाम यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली. भाजपमध्ये असताना पक्षाने दिलेल्या आदेशांचे आपण आठ वर्षे पालन केले. मात्र, आता यापुढे पक्षात राहणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्षात आपल्याला योग्य ते काम मिळत नसल्याची नाराजी त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

यशपाल बेनाम यांनी भाजप सोडण्यामागे वैयक्तिक कारणे असल्याचे सांगितले. पक्षातील काही नेत्यांनी आपल्याला समजून घेतलं नाही. त्यामुळे पक्षात काम करताना अडथळे येत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा परिस्थितीत पक्षात राहणे शक्य नसल्याने पक्षापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे देखील त्यांनी स्पष्ट सांगितले. मात्र, पुढे कोणत्या पक्षात प्रवेश करणार किंवा स्वतंत्रपणे पक्ष स्थापन करणार का , याबाबत त्यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. विशेष म्हणजे, १८ ऑक्टोबर रोजीच आठ वर्षांपूर्वी आपण भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्याच तारखेला पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, हा निव्वळ योगायोग असल्याचे बेनाम यांनी सांगितले. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी स्वतःची एक कविताही सादर केली.

बेनाम यांचा पौडीच्या राजकारणात दीर्घ अनुभव आहे. ते पौडी नगरपालिकेचे तीन वेळा अध्यक्ष राहिले आहेत. २००७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून पौडी मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्या निवडणुकीत त्यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री नरेंद्र सिंह भंडारी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तीरथ सिंह रावत यांना पराभूत केले होते. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर नगरपालिका निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. आता बेनाम यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात ते कोणता निर्णय घेतात, यावर पौडीतील राजकीय घडामोडींची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात आक्षेपाहार्य पोस्ट

Rock Salt: सैंधव मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने काय होते?

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल; धमकी देणारा नेमकं काय म्हणाला?

Karjat Fort : लोखंडी शिड्यांचा थरार अन् खडकाळ वाट, मुंबईपासून काही अंतरावर वसलाय 'हा ' खतरनाक किल्ला

Gokul Election Result : गोकुळचा निकाल आज! कोणाची सत्ता, कोणाला धक्का?

SCROLL FOR NEXT