Uttar pradesh  Saam tv
देश विदेश

महिला IAS अधिकाऱ्याच्या घरात देहविक्रीचं रॅकेट; ४ तरुणींसोबत ५ तरुण आढळले नको त्या अवस्थेत

uttar pradesh crime news : महिला IAS अधिकाऱ्याच्या घरात देहविक्रीचं रॅकेट सुरु असल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी ४ तरुणी आणि ५ तरुणांना ताब्यात घेतलं आहे.

Vishal Gangurde

प्रयागराजमध्ये आयएएस अधिकाऱ्याच्या घरात सुरू होतं भलतंच कांड

पोलिसांना आएएस अधिकाऱ्याच्या घरात थेट देहविक्रीचा व्यवसाय

पोलिसांकडून सर्व आरोपी ताब्यात

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये एका घरात सुरु असलेल्या देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. एका महिला आयएएस अधिकाऱ्याच्या घरात सर्व धक्कादायक प्रकार सुरू होता. या महिला अधिकाऱ्याने महिना १५ हजार रुपयांना भाड्याने दिलं होतं. भाड्याने घरात राहणार्‍या या व्यक्तीने त्याचा चुकीचा वापर केला. त्याने घरात थेट देहविक्रीचा व्यवसाय सुरू केला. अखेर व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलिसांनी महिला आयएएसच्या अधिकाऱ्याच्या घरात धाड मारल्यानंतर पोलिसांना चार तरुणी आणि ५ तरुणांना ताब्यात घेतलं. पोलिसांच्या कारवाईनंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. महिला आयएएस अधिकाऱ्याच्या घरात दररोज तरुण आणि तरुणींची येजा व्हायची. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेजाऱ्यांनी पोलिसांना तक्रार दिली होती. या घराची मालक आयएएस अधिकारी दुसर्‍या ठिकाणी राहते.

शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रविवारी दुपारी या घरात धाड टाकली. त्यानंतर घरात एकच खळबळ उडाली. पोलीस मोठ्या संख्येने आल्याने घटनास्थळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने पोहोचले.

पोलिसांनी ४ तरुणी आणि ५ तरुणींना नको त्या अवस्थेत पकडले. पोलिसांच्या कारवाईनंतर स्थानिक नागरिक एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे. दोन तरुणी प्रयागराज, एक वाराणसी आणि एक पश्चिम बंगालची आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. पुरावे मिळत जाईल, त्यानंतर आणखी कडक कारवाई केली जाईल. पोलिस या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. संपूर्ण कारवाईनंतर या प्रकरणाची माहिती दिली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या घरात गेल्या तीन महिन्यांपासून देहविक्रीचा प्रकार सुरु होता. शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केलीये. सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT