Traffic Police Viral Video Twitter/@JaikyYadav16
देश विदेश

Video: 'विनम्र'पणे धमकी! मंत्रोच्चार करत दुचाकीस्वाराला घातले हेल्मेट; पाहा वाहतूक पोलिसाचा स्वॅग

Traffic Police Viral Video: दुचाकीस्वाराला एका वाहतुक पोलिसांनं चक्क मंत्रोउच्चार करत स्वतःच्या हाताने हेल्मेट घातलं.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: बाईक चालवताना हेल्मेटचा (Helmet)वापर करा असं वारंवार सांगितलं जातं. यासाठी प्रशासनाकडून अनेकदा जनजागृती मोहीमा देखील राबवल्या जातात. पण, तरिही काही नमूने वाहतुकीचे नियम पाळत तर नाहीच शिवाय हेल्मेटचाही वापर करत नाही. यावर एका वाहतुक पोलिसानं जालीम उपाय शोधला आहे. दुचाकीहून बिनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या एका दुचाकीस्वाराला एका वाहतुक पोलिसांनं चक्क मंत्रोउच्चार करत स्वतःच्या हाताने हेल्मेट घातलं. या गंमतीशीर घटनेचा व्हिडिओ सगळीकडे प्रचंड व्हायरल होत आहे. (Traffic Police Viral Video)

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) एक वरिष्ठ वाहतुक पोलिस आणि दुचाकीस्वार दिसत आहे. दुचाकीस्वाराने बाईक चालवताना हेल्मेट परिधान केले नव्हते, त्यामुळे पोलिसांकडून त्याला अडवण्यात आलं. आता इथे सुरू होतो मुख्य खेळ. विनाहेल्मेट पकडल्यानंतर दुचाकीस्वार हा पोलिसांना आपल्याला क्षमा करण्याची विनवणी करु लागला. पोलिसांनीही त्याला माफ केलं. पण, यावेळी या वाहतुक पोलिसांनं त्या दुचाकीस्वाराच्या डोक्यावर स्वतःच्या हाताने हेल्मेट चढवलं, तेही चक्क मंत्रोच्चारांसह!

हिंदी भाषेत वाहतुकीचे नियम या पोलिसानं दुचाकीस्वाराला समजावले आणि तेही मंत्रांच्या स्वरात. सोबतच यापुढे बिनाहेल्मेट फिरल्यास तुमचा चेहरा माझ्या लक्षात आहे, अशी ताकीददेखील त्या दुचाकीस्वाराला दिली आहे. त्यानेही यापुढे विनाहेल्मेट गाडी चालवणार नसल्याचं आणि हेल्मेटचा वापर करणार असल्याचं आश्वासन यावेळी वाहतुक पोलिसाला दिलं आहे. हा गंमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर आता चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, नव्या नियमानुसार (Traffic Rules), जर वाहन चालकाने हेल्मेट (Helmet) घातले असेल पण त्या हेल्मेटची पट्टी खुल्ली असेल तर तुम्हाला १ हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. जर तुम्ही आयएसआय मानांकनाचे हल्मेट घातले नसेल तर तुम्हाला १ हजार रुपये दंड भरावे लागणार. अनेकवेळा काहीजण पोलिसांना चकवा देण्यासाठी खराब झालेले हेल्मेटचा वापर करतात. पण आता यांच्यासाठीही सरकारने नियम कडक केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सन्मान

Chakolya Recipe : 'चकोल्या' ही रेसिपी कधी खाल्ली आहात का? फक्त खमंग वासानेच पोट भरेल

Shocking : ७ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, नामांकित मॉलच्या बेसमेंटमध्ये आरोपीचं भयंकर कृत्य

Office Tips : मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर बॉस तुमच्यावर ओरडतो? 'या' ८ टिप्स नक्की फॉलो करा

वजन कमी करण्यासाठी प्या मेथी आणि सब्जाचे पाणी, १५ दिवसांत कमी होईल पोटावरची वाढलेली चरबी

SCROLL FOR NEXT