TMC MP Protest Saam Tv
देश विदेश

TMC MP Protest: टीएमसीचे खासदार निवडणूक आयोगाबाहेर करत होते निदर्शने, पोलिसांनी घेतलं ताब्यात

Delhi News: निवडणूक आयोगाच्या दिल्ली मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलनाला बसलेल्या तृणमूल काँग्रेसच्या 10 नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात डेरेक ओब्रायन, डोला सेन, साकेत गोखले आणि सागरिका घोष यांचा समावेश होता.

साम टिव्ही ब्युरो

TMC MP Protest:

निवडणूक आयोगाच्या दिल्ली मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलनाला बसलेल्या तृणमूल काँग्रेसच्या 10 नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात डेरेक ओब्रायन, डोला सेन, साकेत गोखले आणि सागरिका घोष यांचा समावेश होता.

हे सर्वजण सीबीआय, ईडी आणि एनआयए प्रमुख बदलण्याची मागणी करत होते. घटनास्थळावरील काही व्हिडिओही समोर आले आहेत. ज्यात पोलीस टीएमसी खासदारांना ताब्यात घेताना दिसत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसच्या (TMC) 10 सदस्यीय शिष्टमंडळाने सोमवारी निवडणूक आयोगाच्या पूर्ण खंडपीठाची भेट घेतली. शिष्टमंडळाने सीबीआय, ईडी आणि एनआयए प्रमुख बदलण्याची मागणी केली होती. यानंतर तृणमूलच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाबाहेर 24 तास आंदोलन करण्याची घोषणा केली होती.  (Latest Marathi News)

पोलिसांनी टीएमसी खासदारांना अनेकवेळा निषेध थांबवण्याचे आवाहन केले. यानंतर त्यांनी कारवाई करत खासदारांना ताब्यात घेतलं. टीएमसी नेत्यांचा आरोप आहे की, केंद्रीय तपास यंत्रणा सार्वत्रिक निवडणुकांआधी विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करत आहेत.

युद्धबद्दल बोलताना टीएमसी नेत्या सागरिका घोष म्हणाल्या, “आम्ही 1 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. निवडणूक लोकशाहीत समान संधी ही मूलभूत गोष्ट आहे.'' त्या म्हणाल्या, "सीबीआय, एनआयए, ईडी आणि प्राप्तिकर अधिकारी ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते पाहता ते भाजप शाखेचे सदस्य असल्याचे दिसते.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT