जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून 29 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलची गोळ्या झाडून हत्या  Saam Tv
देश विदेश

जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून 29 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलची गोळ्या झाडून हत्या

जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी परत एकदा पोलिसांना लक्ष्य केले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : जम्मू- काश्मीरमध्ये Jammu and Kashmir दहशतवाद्यांनी Terrorists परत एकदा पोलिसांना लक्ष्य केले आहेत. रविवारी रात्री उशिरा श्रीनगरच्या बटमालू या भागात दहशतवाद्यांनी एका पोलिसाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसाची हत्या केल्यावर दहशतवादी घटना स्थळावरून पळून गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर मधील बटमालू भागात एसडी कॉलनीमध्ये दहशतवाद्यांनी २९ वर्षीय पोलीस हवालदार तौसीफची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पोलीस हवालदाराच्या डोक्यात गोळी लागली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसराला मोठ्या प्रमाणात घेराव घालण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी स्थानिक पोलीस आणि लष्कराकडून संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.

हे देखील पहा-

नॅशनल कॉन्फरन्सने NC या हल्ल्याचा निषेध केला आहे. पक्षाने ट्विट केले, श्रीनगरच्या बाटमालू २९ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या या हल्ल्याचा आम्ही स्पष्टपणे निषेध करत आहे. निंदा करायला शब्द पुरेसे ​​नाही. या जम्मू- काश्मीरमध्ये लष्कराच्या कारवाईमुळे घाबरलेले दहशतवादी नागरिक, पोलीस आणि लष्कराच्या जवानांना लक्ष्य करत आहेत.

२ दिवसांपूर्वी श्रीनगरमधील SKIMS मेडिकल कॉलेजच्या बाहेर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाला लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला होता. ही गोळीबार केल्यावर दहशतवादी घटनास्थळावरुन फरार झाले होते. सुदैवाने दहशतवाद्यांच्या गोळीबारात सुरक्षा दलाच्या कोणताही जवान जखमी झाला नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT