Poland Parliament Smog Saam Digital
देश विदेश

Poland Parliament Smog: संसदेत जे आज घडलं तशीच घटना पोलंडच्या सभागृहातही घडली, नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Poland Parliament Smog: ज्यू समुदायासाठी संसदेत आयोजित हनुक्का कार्यक्रमात एका डाव्या विचारसरणीच्या व्यक्तीने कार्यक्रमाला विरोध करत जवळच असलेल्या अग्निशमन यंत्राने मेनबत्या विझवायला सुरुवात केली. त्यामुळे संसदेच्या संपूर्ण सभागृहात धूर पसरला

Sandeep Gawade

Poland Parliament Smog

भारताच्या संसदेत सुरक्षा भेदून दोन तरुणांनी धुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच असाच प्रकार पोलंडच्या संसदेतही घडला आहे. ज्यू समुदायासाठी संसदेत आयोजित हनुक्का कार्यक्रमात एका डाव्या विचारसरणीच्या व्यक्तीने कार्यक्रमाला विरोध करत जवळच असलेल्या अग्निशमन यंत्राने मेनबत्या विझवायला सुरुवात केली. त्यामुळे संसदेच्या संपूर्ण सभागृहात धूर पसरला आणि खासदारांना श्वास घेणेही मुश्कील झाले, त्यामुळे तोडांला रुमाल लावून खासदारांनी संसंदेबाहेर पळ काढला. आजतकने या संदर्भात वृत्त दिलं आहे

ब्रॉन असं या व्यक्तीचं नावं असून पोलिश संसदेचे उजव्या विचारसरणीचे खासदार ग्रेगोर्झ ब्रॉन यांनी ज्यू समुदायासाठी संसदेच्या लॉबीत या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. दरम्यान या व्यक्तीच्या कृत्यामुळे सभागृहात गदारोळ पहायला मिळाला. त्यानंतर या व्यक्तीला तेथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले आणि सभागृहातून बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशय मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान सभागृहात मोठ्या प्रमाणात धूर झाल्यामुळे संसद सदस्यांना श्वास घेणेही मुश्कील झाले. त्यामुळे सर्व खासदारांनी तोंडाला रुमाल लावत सभागृहातून काढता पाय घेतला. यावद्दल ब्रॉनला विचारलं असता, तो म्हणाला की, अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये लोक सहभागी होतात. त्यांनी याबद्दल खेद वाटला पाहिजे. असे उत्सव शैतानी असतात असा दावा त्याने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

Rishi Panchami Bhaji : ऋषी पंचमीच्या दिवशी 'या' २१ भाज्यांचा दाखवा नैवेद्य , वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली...

Blood Pressure : केळी ब्लड प्रेशरसाठी का फायदेशीर असतात का?

SCROLL FOR NEXT