Gujarat Election 2022, PM Narendra Modi
Gujarat Election 2022, PM Narendra Modi Ani
देश विदेश

Gujarat Election 2022 : गुजरातचा कौल कुणाला? पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

साम टिव्ही ब्युरो

Gujarat Election 2022 : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. गुजरातमधील 14 जिल्ह्यांतील 93 जागांसाठी हे मतदान होत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहचले. यावेळी मोदींना रांगेत उभे राहून मतदान केलं. मोदींनी मतदान करताच, उपस्थितांनी मोदी, मोदी, हर हर मोदी घर घर मोदी, जय श्रीराम यांसारख्या घोषणा दिल्या.  (Latest Marathi News)

 पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरात विधानसभेसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. सकाळी ८ वाजता पासून मतदानाला सुरूवात झाली असून असून नागरिकांना संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान १ डिसेंबर रोजी पार पडले. पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान पडले.

 गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात आज ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. भाजप,काँग्रेस आणि आम आदमी पक्ष अशी तिरंगी लढत या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. यासाठी ८३३ उमेदाद्वार रिंगणात आहे. या ९३ जागांपैकी अहमदाबादमधील १६ जागा यंदा भाजपासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे बोलले जात आहे. भाजपाने १९९० पासून या जागांवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने ९३ पैकी ५१जागा जिंकल्या, तर काँग्रेसने ३९ जागांवर विजय मिळवला होता. मध्य गुजरातमध्ये भाजपला 37 तर काँग्रेसला 22 जागा मिळाल्या आहेत. पण उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते आणि त्यांनी 17 जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ 14 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी आप सुद्धा गुजरातमध्ये निवडणूक लढवत असल्याने चुरशीची लढत होईल, असा चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नरेंद्र मोदींची पुण्यात सभा, अमित ठाकरे सभेसाठी रवाना

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का; मालोजीराजे छत्रपतींना विश्वास, Video

Nashik Loksabha: नाशिक लोकसभेत मोठा ट्वीस्ट! शांतीगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून भरला अर्ज

Video: Abhijeet Patil भाजपला मदत करणार? फडणवीसांच्या भेटीनंतरचं उत्तर चर्चेत!

SCROLL FOR NEXT