PM Narendra modi  Saam tv
देश विदेश

सोने खरेदी अन् विदेश यात्रा टाळा, पेट्रोल-डिझेल-गॅस जपून वापरा; PM मोदी यांचं मोठं आवाहन

pm narendra modi : पश्चिम आशियातील तणावावरून PM मोदी यांनी नागरिकांना मोठं आवाहन केलं आहे. मोदींनी सोने खरेदी अन् विदेश यात्रा टाळण्याचे आवाहन केलं आहे.

Vishal Gangurde

इराण-अमेरिकेत पुन्हा वादाची ठिणगी

पश्चिम आशियाच्या तणावावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं भाष्य

सोने खरेदी, इंधन जपून वारण्याचे मोदींनी केलं आवाहन

इराण-अमेरिकेत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. इराण-अमेरिकेचे प्रमुख दोन्ही एकमेकांविरोधात आक्रमक झाले आहेत. याचा फटका जगातील सर्व देशांना बसू लागला आहे. मागील काही दिवसांत भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ झाली. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं भाष्य केलं आहे. एक वर्ष परदेशात यात्रा करणे टाळा, इंधनाचा वापर गरजेनुसार करा आणि एक वर्ष सोने खरेदी टाळावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रविवारी हैदराबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील आयोजित कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना मोठं भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी कोरोना काळाची आठवण करून दिली. त्यांनी वर्क फ्रॉम होम' पद्धतीला प्रोत्साहन देण्याविषयी सांगितलं. पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्यासही सांगितलं.

'मागील दोन महिन्यात पश्चिम आशियात युद्ध सुरू आहे. याचा परिणाम जगावर पडत आहे. युद्धाचा परिणाम भारतावरही झाला आहे. भारतात मोठे मोठे तेलाच्या विहीर नाहीत. पेट्रोल, डिझेल, गॅस या गोष्टी दुसऱ्या देशातून आयात करावे लागतात. युद्धामुळे पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर, खताच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गगनाला भिडल्या आहेत, असे मोदींनी सांगितले.

'कोरोना काळात वर्क फ्रोम होम केलं. व्हिडिओ कॉन्फ्रेन्स, ऑनलाइन मीटिंग्स... सारख्या व्यवस्था विकसित केल्या. त्याची सवय देखील झाली होती. आता पुन्हा तशीच व्यवस्था सुरू करायला हवी. ती व्यवस्था देशाच्या हितासाठी पुन्हा सुरू करायला हवी. त्यास प्राधान्य द्यायला हवं, असे मोदी यांनी सांगितले.

'संकटकाळात विदेशी चलन वाचवण्यावर भर द्यायला हवा. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे भारतीयांची जबाबदारी आहे. भारत देश सुधार एक्स्प्रेसवर आहे. देशाच्या आधुनिक पायाभूत सुविधा तयार आहेत. तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र वेगात काम करत आहे, असेही पंतप्रधान मोदींनी पुढे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरे यांची रामनगर येथील राम मंदिरासमोरील रस्त्यावर सभा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्र्याचे निधन; विधानभवनात पार्थिवाचे अंतिम दर्शन, मुख्यमंत्री, आमदारांनी वाहिली श्रद्धांजली

Railway Rules : प्रवाशांनो रेल्वेचं तिकीट रद्द करण्यापूर्वी वाचा 'हे' नवे नियम, नाहीतर मिळणार नाही रिफंड

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी! बंद झालेला ₹1500 चा हप्ता पुन्हा सुरू होणार, आदिती तटकरेंनी दिली अपडेट

Marathi Actress : 'वीण दोघांतली ही तुटेना' फेम अभिनेत्रीने खरेदी केली लग्जरी कार, नव्याकोऱ्या गाडीसोबत शेअर केला PHOTO

SCROLL FOR NEXT