Narendra Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (28 मे) दिल्लीतील नवीन संसद भवनाचे उद्घाटन पार पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थितांना संबोधित केले. 'हे केवळ भवन नाही, १४० कोटी भारतीयांचं आकांक्षा आणि स्वप्नाचं प्रतिबिंब आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करताना म्हटले. (Latest Marathi News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ' देशात काही क्षण येतात, असे क्षण कायमचे स्मरणीय होतात. काही तारखा, क्षण पुढच्या काळाच्या इतिहासाच्या स्वाक्षऱ्या बनतात. आज आपण स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. आज संसद परिसरात सर्वपंथ प्रार्थना झाली. आज देशातील नागरिकांना या सुवर्ण क्षणाच्या शुभेच्छा देतो. हे केवळ भवन नाही, १४० कोटी भारतीयांचं आकांक्षा आणि स्वप्नाचं प्रतिबिंब आहे'.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी चोळ साम्राज्याचाही उल्लेख केला. नरेंद्र मोदी म्हणाले, ' चोळ साम्राज्यात सेंगोल हे कर्तव्य पथ, सेवा पथ, राष्ट्र पथाचं प्रतीक मानलं जात होतं. सेंगोल हे सत्ता हस्तांतरित करण्याचं प्रतीक होतं. तमिळनाडूमधून आलेले संत आज सकाळी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. त्यांच्या मार्गदशनाखाली पवित्र सेंगोल स्थापन करण्यात आलं'.
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ' भारताचं संविधानच आमचा संकल्प आहे . जो व्यक्ती थांबत नाही, त्याचं भाग्य निरंतर पुढे जात राहते. यासाठी पुढे जात राहा. आपण स्वातंत्र्यांनंतर नवीन यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा करताना अनेक चढ-उतार आले. अनेक आव्हानांचा सामना करत आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलं आहे'.
'नवीन संसद भवन आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने साकार करण्याचे साधन बनेल. नवीन भवनाची इमारत स्वालंबी भारताचा सूर्योदर्य पाहणार आहे. या भवनामुळे विकसित भारताच्या संकल्पाची पूर्तता होणारआहे. नवे पॅटर्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला नव्या वाटांवर चालावे लागते. तेव्हाच नव्या वाटा निर्माण करतात. आज नवा भारत नवीन ध्येय निश्चित करत आहे, असे नरेंद्र मोदी पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.