PM Modi & President Kovind wishes people happy holi
PM Modi & President Kovind wishes people happy holi  Saam Tv
देश विदेश

राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांनी दिल्या देशवासियांना होळीच्या शुभेच्छा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - आज संपूर्ण देशात होळी हा सण पूर्ण उत्साहात साजरा केला जात आहे. या रंगांच्या सणासाठी देशातील प्रत्येक शहरात जय्यत तयारी सुरू आहे. गुरुवारी रात्री होलिका दहनानंतर आज रंग खेळले जाणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करत त्यांनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाचे प्रतीक असलेला हा रंगांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाचे सर्व रंग घेऊन येवो.

तर दुसरीकडे, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी होळीच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करत ते म्हणाले की, होळीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासियांचे मनःपूर्वकअभिनंदन आणि शुभेच्छा. होळी हा रंगांचा सण, सामुदायिक सलोख्याचे जिवंत उदाहरण आहे. हा सण वसंत ऋतूच्या आगमनाची आनंदाची बातमी घेऊन येतो. सर्व देशवासियांच्या जीवनात आनंद, उत्साह आणि नवी ऊर्जा घेऊन येणार हा सण आहे. होळीच्या शुभमुहूर्तावर मी देश-विदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना माझ्या शुभेच्छा देतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar Crime: पुष्पा स्टाईलने सागवान लाकडाची तस्करी; जमिनीत पुरलं 11 लाख रुपयांची लाकडं

Manoj Jarange Patil: उपोषणावर ठाम, निवडणुकीत फोडणार घाम; जरांगे उतरणार विधानसभेच्या मैदानात

RCB vs CSK IPL 2024: नॉकऑउट सामन्यात आरसीबी २००पार; CSK समोर २१९ धावांचं आव्हान

TVS ची ही बाईक देते 65 Kmpl मायलेज, फक्त लूक नाही फीचर्सही हाय क्लास; जाणून घ्या किंमत

Special Report : फिक्स झालं, जरांगे पाटील आता थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात!

SCROLL FOR NEXT