PM Modi News  Saam TV
देश विदेश

PM Modi News : महिलेच्या दमदार भाषणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभावित, थेट निवडणूक लढवण्याची दिली ऑफर, पाहा VIDEO

PM Modi News : या कार्यक्रमात चंदा देवी नावाच्या महिलेच्या भाषणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके प्रभावित झाले की, त्यांनी या महिलेला थेट निवडणूक लढवण्याची ऑफर देऊन टाकली.

प्रविण वाकचौरे

PM Modi News :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी विकासनशील भारत संकल्प यात्रेअंतर्गत विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी बचत गटाच्या महिलांच्या कार्यक्रमात देखील पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते.

या कार्यक्रमात चंदा देवी नावाच्या महिलेच्या भाषणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके प्रभावित झाले की, त्यांनी या महिलेला थेट निवडणूक लढवण्याची ऑफर देऊन टाकली.

बचत गटातील कार्यक्रमाला संबोधित करणारी महिला 'लखपती महिला' कार्यक्रमाशी संबंधित आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील योगी सरकार तीन वर्षांत प्रत्येक सहभागी महिलेला करोडपती बनवण्याचा प्रयत्न करत आहे. (Latest Marathi News)

कार्यक्रमात चंदा देवी यांनी सुंदर भाषण केलं. भाषण ऐकल्यानंतर पंतप्रधान म्हणाले की, तुम्ही खूप चांगले भाषण करता. तुम्ही कधी निवडणूक लढवली आहे का? यावर चंदा देवी यांनी नाही उत्तर दिलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांना निवडणूक लढवणार का? अशी ऑफर दिली. (Political News)

तुम्ही जे काम करत आहात त्यातून आम्हाला प्रेरणा मिळते. मी तुमच्यासमोर उपस्थित आहे, तुमच्यासमोर दोन शब्द बोलत आहे ही माझ्यासाठी अभिमानस्पद बाब आहे, असं चंदा देवी यांनी म्हटलं.

‘लखपती महिला कार्यक्रम’ ही उत्तर प्रदेश सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या कार्यक्रमाशी संबंधित प्रत्येक महिला तीन वर्षात करोडपती बनवण्याचा योगी सरकारचा प्रयत्न आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मतदारसंघ वाराणसी अंतर्गत विकसित ग्रामीण भाग असलेल्या सेवापुरी येथील विकासशील भारत संकल्प यात्रेत भाग घेतला. तेथे शाळकरी मुलांशी संवाद साधला. मुलांना शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधांची प्रशंसा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakshabandhan 2025: रक्षाबंधनात ओवाळणीच्या ताटात कोणत्या गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते?

ITBP Bus Accident: धक्कादायक! जवानांची बस नदीत कोसळली, क्षणात झालं होत्याचं नव्हतं|VIDEO

Maharashtra Live News Update: पंढरपूर वरून परत ठेऊन संत गजानन महाराज यांची पालखी शेवटच्या टप्प्यात पोहोचली

Parbhani Crime : परभणीत खळबळ; मध्यवस्तीत आढळला महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशय

Shocking News: नूडल्स खाणाऱ्यांनो सावधान! पाकिटामध्ये आढळली मेलेली पाल; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT