narendra modi  saam tv
देश विदेश

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होणार; पैशांचं काय करणार ?

अनेक राजकीय नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना भेटवस्तू दिल्या. या मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

शिवाजी काळे

Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज, शनिवारी १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना भेटवस्तू दिल्या. या मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव आज, शनिवारपासून लिलाव करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यनंतर पहिल्यांदा दिल्लीत आले, तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट दिली होती. मूर्तीसह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या अंबाबाईच्या मूर्तीचाही लिलाव होणार आहे. १७ सप्टेंबरपासून या लिलावाची सुरुवात होणार आहे. राजधानी नवी दिल्लीतल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये असलेल्या भेट वस्तूंचा लिलाव होणार आहे. या लिलावातून मिळालेल्या रक्कमेचा वापर 'नमामी गंगा' प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे.

मोदींच्या वाढदिवसानिमित्त आज 'या' राज्यात जन्मणाऱ्या मुलांना मिळणार सोन्याची अंगठी

दरम्यान, आज देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांचा वाढदिवस साजरा होत आहे. देशभरातून त्यांना शुभेच्छा येत आहेत. भाजप कडून देशभरात वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. तामिळनाडू भाजपकडूनही मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. वाढदिवसानिमित्त आज जन्मणाऱ्या मुलांना सोन्याच्या अंगठ्या देण्यात येणार आहेत.

तसेच ७२० किलो मासे वाटप करण्यात येणार आहेत. मत्स्यव्यवसाय आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी ही घोषणा केली आहे. 'आम्ही चेन्नईतील सरकारी RSRM रुग्णालयाची निवड केली आहे. या ठिकाणी जन्मलेल्या सर्व मुलांना सोन्याच्या अंगठ्या दिल्या जाणार आहेत. अंगठी सुमारे २ ग्रॅम सोन्याची असेल, ज्याची किंमत सुमारे ५००० रुपये असू शकते, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT