Pm Narendra Modi New Look Saam TV
देश विदेश

Pm Narendra Modi New Look: काळी टोपी, खाकी रंगाची पँट आणि प्रिंटेड टी-शर्ट; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा न्यू लूक

Pm Narendra Modi Latest News : न्यू लूकमध्ये पंतप्रधान मोदींची जंगल सफारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pm Narendra Modi Latest News : व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट देणार आहेत. यादरम्यान ते बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात सफारीचा आनंद घेणार आहेत.

दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या लूकचे फोटो समोर आले आहे. या फोटोमध्ये खाकी रंगाच्या प्रिंटेड टी-शर्टमध्ये पंतप्रधान दिसत आहेत. त्यांनी काळी टोपी आणि काळे शूजही घातले आहेत. फोटोमध्ये पंतप्रधान मोदी हातात हाफ जॅकेट घेऊन दिसत आहेत.  (Latest Marathi News)

या दौऱ्यात पंतप्रधान नुकत्याच झालेल्या व्याघ्रगणनेचा अहवाल, व्याघ्र संवर्धनासाठी सरकारचा दृष्टीकोन यांचेही प्रकाशन करतील आणि या कार्यक्रमाच्या स्मरणार्थ एक नाणेही जारी करतील. या निमित्ताने म्हैसूर आणि चामराजनगर जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय मेगा इव्हेंटचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.

पंतप्रधान मोदी आयबीसीएचा (IBCA करणार शुभारंभ

पंतप्रधान मोदी सकाळी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट देणार आहेत. त्यानंतर 11 वाजता वाघांच्या संख्येची आकडेवारी जाहीर होणार आहे.

यादरम्यान ते 'अमृतकाळा' दरम्यान व्याघ्र संवर्धनासाठी सरकारचे व्हिजन देखील प्रसिद्ध करतील आणि आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स (IBCA) देखील लॉन्च करतील. IBCA जगातील सात मोठ्या मांजरींच्या संवर्धन आणि संरक्षणावर लक्ष केंद्रित करेल. यात वाघ, सिंह, बिबट्या, स्नो लेपर्ड, प्यूमा, जग्वार आणि चित्ताचा समावेश आहे.

कर्नाटकात 10 मे रोजी होणार निवडणूक

दरम्यान, कर्नाटकात निवडणुका तोंडावर आल्या आहेत. तेथे 10 मे रोजी निवडणूक होणार असून त्याचे निकाल 13 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा हा दौरा विशेष मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

इराणचा इस्त्रायलवर मिसाईल हल्ला; आखाती युद्ध पुन्हा भडकणार?

cockroach janata party : भेटूया पुण्यात, जय महाराष्ट्र! अभिजीत दीपकेची घोषणा; कॉकरोच जनता पार्टी करणार पुण्यात आंदोलन

Maharashtra News Live Update: मिरजगाव परिसरात मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? उद्धव ठाकरेंसोबत शिवतीर्थावर चर्चा?

SCROLL FOR NEXT