pm narendra modi donates to party fund, know how much money he gave  Saam TV
देश विदेश

PM मोदींनी पार्टी फंडात दिली देणगी, जाणून घ्या किती रक्कम दिली

PM Narendra Modi Latest News: भारतीय जनता पक्षाच्या देणगी मोहिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हातभार लावला आहे.

Satish Kengar

PM Narendra Modi Latest News:

भारतीय जनता पक्षाच्या देणगी मोहिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हातभार लावला आहे. पंतप्रधानांनी नमो ॲपद्वारे २००० रुपयांची देणगी दिली आहे. सोशल मीडिया साइट X वर त्यांनी याबद्दल पोस्ट केली आहे.

पक्षासाठी योगदान देताना मला खूप आनंद होत आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. याआधी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक नेत्यांनी नमो ॲपद्वारे पक्ष निधीसाठी देणगी दिली आहे. या लोकांनी वेगवेगळ्या रकमा दान केल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे पक्षाला देणगी दिल्याची माहिती दिली आहे. विकसित भारत घडवण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ द्या, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. याशिवाय त्यांनी सर्वसामान्यांकडून देणग्या मागितल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे की, मी सर्व लोकांना नमो ॲपद्वारे देणगी देऊन भारताच्या उभारणीत सहभागी होण्याचे आवाहन करतो. (Latest Marathi News)

दरम्यान, याच्या एक दिवसापूर्वी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण १९५ उमेदवारांची नावे आहेत.

पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचाही समावेश आहे. याशिवाय अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदारांचीही नावे या यादीत आहेत. मात्र पक्षाने दिल्लीत काही बदल केले असून अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कापली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT