PM Modi's Brother Hospitalized Saam Tv
देश विदेश

PM Modi's Brother Hospitalized : पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी रुग्णालयात दाखल; काय आहे कारण?

चेन्नईतील अपोलो रुग्णालयात प्रल्हाद मोदी यांना दाखल करण्यात आले आहे.

Shivani Tichkule

PM Modi Brother Prahlad Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. किडनीशी संबंधित उपचारांसाठी त्यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रल्हाद मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत. 

कोण आहेत प्रल्हाद मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना 5 भावंडे असून त्यात प्रल्हाद हे चौथ्या क्रमांकावर आहे. 5 भावंडांमध्ये तो चौथा आहे. ते पीएम मोदींपेक्षा 2 वर्षांनी लहान आहेत. प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) यांचे अहमदाबादमध्ये किराणा मालाचे दुकान असून त्यांचे टायरचे शोरूमही आहे.

यापूर्वी 2018 मध्ये प्रल्हाद मोदी चर्चेत आले होते. त्यावेळी गुजरात रास्त भाव दुकान आणि केरोसीनचा परवाना घेतलेल्या ग्राहकांमध्ये जोरदार वाद सुरू होते. याच विरोधात प्रह्लाद मोदींनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी ते गुजरात (Gujarat) रास्त भाव दुकान मालकांच्या संघटनेचे अध्यक्ष होते.

पंतप्रधान मोदी यांना पाच भावंडं

पीएम मोदींना ५ भावंडे आहेत. त्यांना एक बहीण आणि 4 भाऊ आहेत. सोमा मोदी, अमृत मोदी, नरेंद्र मोदी, प्रल्हाद मोदी, पंकज मोदी आणि एक बहीण वासंती मोदी. पंतप्रधानांच्या मोठ्या भावाचे नाव सोमा मोदी आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT