Pm Narendra Modi Birthday Saam Tv
देश विदेश

PM Narendra Modi Birthday: 'या' कलाकाराने PM मोदींना दिल्या, १,२१३ चहाच्या कपांमधून वाढदिवसाच्या शुभेच्छा !

सुदर्शन पटनायक प्रत्येकवर्षी पीएम मोदींच्या वाढदिवसाला वेगवेगळ्या शैलीत वाळूची शिल्पे बनवतात.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त (Happy Birth PM Narendra Modi) प्रसिद्ध शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी मोदींना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ओडिशाच्या पुरी समुद्रकिनाऱ्यावर १,२१३ मातीच्या चहाच्या कपांमधून पंतप्रधान मोदींचे शिल्प बनवले आहे.

कलाकार पटनायक यांनी बनवलेल्या या ५ फूट उंचीच्या पुतळ्यासाठी त्यांनी सुमारे ५ टन वाळू वापरली आहे. याशिवाय त्यांनी वाळूवर 'हॅपी बर्थडे मोदीजी' असा संदेशही लिहिला आहे.

दरवर्षी पीएम मोदींच्या(Pm Narendra Modi) वाढदिवसाला पटनायक वेगवेगळ्या प्रकारे वाळूची शिल्पे बनवतात. यावर्षी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुदर्शन म्हणाले, 'आम्ही वाळूच्या शिल्पात मातीच्या चहाचे कप वापरून मोदींचा चहा विक्रेता ते भारताचे पंतप्रधान असा प्रवास दाखवला आहे. आज पुन्हा एकदा आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांना शुभेच्छा देत आहोत.

पद्मश्री सुदर्शन यांनी जगभरातील ६० हून अधिक आंतरराष्ट्रीय वाळू कला स्पर्धा आणि महोत्सवांमध्ये भाग घेतला आहे. यासोबतच त्यांनी देशासाठी अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. पटनायक आपल्या कलेमुळे अनेकदा चर्चेत राहतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT