Karnataka Elections 2023 Saam Tv
देश विदेश

Karnataka Elections 2023: पंतप्रधान मोदींचे कर्नाटकच्या मतदारांना आवाहन; मध्यरात्री केला व्हिडिओ ट्विट, म्हणाले, 'तुमची स्वप्ने ही माझी स्वप्ने, ती...

भाजप सरकार पूर्ण प्रामाणिकपणे काम करेल यावरही पंतप्रधानांनी भर दिला आहे.

Shivani Tichkule

Pm Narendra Modi Tweet: कर्नाटकातील निवडणूक प्रचार सोमवारी (8 मे) संध्याकाळी 5 वाजता संपला. राज्यात बुधवारी (10 मे) मतदान होणार आहे. प्रचार थांबल्यानंतरही पंतप्रधान मोदींनी काल रात्री १२.२१ वाजता कर्नाटकच्या जनतेसाठी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. भाजपच्या ट्विटर हँडलवर पंतप्रधानांचा हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

या व्हिडिओमध्ये पीएम मोदी भाजपला (BJP) मत देण्याचे आवाहन करत आहेत. 8 मिनिटे 25 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये पंतप्रधान म्हणाले की, कर्नाटकला एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी दुहेरी इंजिन सरकारची गरज आहे. पंतप्रधान म्हणाले की, 'तुमची स्वप्ने, ही माझी स्वप्ने आहे ती आपण आम्ही मिळून पूर्ण करू'. भाजप सरकार पूर्ण प्रामाणिकपणे काम करेल यावरही पंतप्रधानांनी भर दिला आहे. 

'भारताला विकसित देश बनवण्याचा संकल्प करा'

पीएम मोदी (Narendra Modi) म्हणाले की, कर्नाटकातील जनतेचे खूप प्रेम मिळाले आहे. कर्नाटकात भाजपचे सरकार येणार. भारताला विकसित देश बनवण्याचा संकल्प भारतातील जनतेने केला आहे. विकसित भारताच्या संकल्पाचे नेतृत्व करण्यासाठी कर्नाटकात ऊर्जा आहे. सध्या भारत ही जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. आता आपला संकल्प देशाचा पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये समावेश करण्याचा आहे. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा कर्नाटकची (Karnataka) अर्थव्यवस्था वेगाने विकसित होईल. (Political News)

'भाजपच्या धोरणांमुळे कर्नाटकच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार होईल'

सध्या कर्नाटकातील जनतेने डबल इंजिन सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळातील कारभार पाहिला आहे. भाजप सरकारची निर्णायक, केंद्रीत आणि भविष्यवादी धोरणे कर्नाटकच्या अर्थव्यवस्थेच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कोरोनासारख्या महामारीनंतरही कर्नाटकातील भाजप सरकारच्या कार्यकाळात विदेशी गुंतवणूक आणि एफडी वार्षिक 90 हजार कोटी रुपयांवर आली होती, त्याचवेळी मागील सरकारच्या काळात हाच आकडा केवळ 30 हजार कोटी रुपयांच्या आसपास होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT