PM Modi US Visit Speech today LIVE SAAM TV
देश विदेश

Modi Speech Today : अमेरिकी संसदेत PM मोदींचे भाषण; १५ वेळा खासदार उभे राहिले, ७९ वेळा टाळ्यांनी दिली दाद

PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी संसदेच्या संयुक्त सभेला संबोधित केले. दहशतवाद हा जगासाठी धोकादायक असल्याचंही त्यांनी निक्षून सांगितले.

Nandkumar Joshi

PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी संसदेच्या संयुक्त सभेला संबोधित केले. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे होणाऱ्या नुकसानीचा उल्लेख करतानाच, दहशतवादाच्या मुद्द्यालाही हात घातला. दहशतवाद हा जगासाठी धोक्याचा असल्याचंही त्यांनी निक्षून सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अमेरिकी संसदेतील भाषणातून जगाला सतर्कतेचा इशाराही दिला. अमेरिकेत ९/११ च्या हल्ल्यानंतर मुंबईत २६/११ ला हल्ला झाला. एका दशकापेक्षा अधिक काळ लोटला आहे. मात्र, अजूनही जगासाठी दहशतवाद आणि कट्टरतावाद धोकादायक आहे, असे मोदींनी सांगितले.

अमेरिकी संसदेत टाळ्यांचा कडकडाट

पंतप्रधान मोदी ज्यावेळी अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त सभेला संबोधित करत होते, त्यावेळी अमेरिकी खासदारांनी किमान १५ वेळा उभे राहून टाळ्या वाजवल्या. तब्बल ७९ वेळा ही ऐतिहासिक वास्तू टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणली. मोदींच्या भाषणाचा समारोप झाला त्यावेळीही खासदारांनी उभं राहून त्यांचे स्वागत केले आणि टाळ्यांनी दाद दिली. (Latest Marathi News)

अमेरिकी खासदारांनी PM मोदींसोबत घेतला सेल्फी

अमेरिकी संसदेतील संयुक्त सभेला संबोधित करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणानं उपस्थित खासदारांनी मनं जिंकली. सभागृहातील अनेक सदस्यांनी मोदींसोबत सेल्फी घेतला. तसेच त्यांच्याशी चर्चा केली. काहींनी तर त्यांचा ऑटोग्राफही घेतला.

जवळपास तासभर भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकी संसदेत जवळपास तासभर भाषण केले. अमेरिकेतील लोकशाही जगात सर्वात जुनी आहे, तर भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. दोन्ही देशांची भागीदारी लोकशाहीच्या भविष्यासाठी खूपच चांगली आहे. यावेळी मोदींनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून थेट नाव न घेता पाकिस्तानला झोडपून काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

Maharashtra Live News Update: जांभोरा येथील पाझर तलाव फुटला, शेतीचे मोठं नुकसान

Janhvi Kapoor: चंद्रावाणी मुखडा तिचा...; जान्हवी कपूरचा दहीहंडी स्पेशल लूक पाहिलात का?

Shirdi : दहीहंडीच्या मिरवणुकीत हत्येचा थरार, जुन्या वादातून मित्रांकडून १८ वर्षीय तरुणाची हत्या

Elvish Yadav House Firing: धावत धावत आले अन् धाड धाड धाड झाडल्या दोन डझनभर गोळ्या, गोळीबाराचा CCTV व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT