Narendra Modi distribute appointment letters latest news SAAM TV
देश विदेश

PM Modi in Rozgar Mela 2023 : फोन बँकिंग घोटाळा मागील सरकारमधील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक : PM मोदी

Narendra Modi distribute appointment letters: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोजगार मेळाव्यात ७० हजारांपेक्षा अधिक उमेवारांना नियुक्तीपत्रे दिली.

Nandkumar Joshi

PM Narendra Modi Slams Congress : देशभरात ४४ ठिकाणी शनिवारी, २२ जुलै रोजी रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७० हजारांपेक्षा अधिक उमेवारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नियुक्तीपत्रे दिली. यावेळी मोदींनी गांधी घराण्याचं नाव न घेता हल्लाबोल केला.

रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या युवकांना नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. देशासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. युवकांना सरकारी नोकरीत येण्याची सर्वात मोठी संधी आहे. तुम्हाला देशाचं नाव उज्ज्वल करून दाखवायचं आहे. भारताची ९ वर्षांत जगात ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे आणि जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे, असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.

देशासाठी आजचा दिवस ऐतिहासिक

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ज्या युवकांना नियुक्तीपत्रे मिळाली आहेत, त्यांच्यासाठी आजचा दिवस विस्मरणीय आहे. तसेच देशासाठीही ऐतिहासिक दिवस आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव काळात देश विकसित होण्याचं जे लक्ष्य आहे, त्या मार्गावर काम करत आहे. तुमचं सरकारी नोकरीत येणं ही सर्वात मोठी संधी आहे. नियुक्ती पत्र मिळालेल्या सर्व युवकांना शुभेच्छा.

गांधी कुटुंबावर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधी कुटुंबाचा उल्लेख न करता हल्लाबोल केला. एकेकाळी देशात फोन बँकिंग घोटाळा होत होता. आधीच्या सरकारमध्ये बँकेकडून एकाच कुटुंबातील लोक कर्ज देत होते. मागील सरकारने बँकांचे नुकसान केले. आम्ही बँक लुटणाऱ्यांची संपत्ती जप्त केली, असे मोदी म्हणाले.

९ वर्षांपूर्वी फोन बँकिंग सेवा माझ्या आणि तुमच्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी नव्हती. त्यावेळी एका खास कुटुंबाचे नीकटवर्तीय, काही शक्तिशाली नेते बँकेला फोन करून आपल्या माणसांना हजारो कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देत होते. त्या कर्जाची परतफेडही होत नव्हती. हा फोन बँकिंग घोटाळा मागील सरकारच्या काळातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक होता, असा आरोपही मोदींनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: वारंवार चेहऱ्यावर पिंपल्स येतात? मेकअप रिमूव्हल करताना ही 1 चूक टाळा

Maharashtra Live News Update: पुणे माणगाव महामार्गावर वाहतूक कोंडी

Pineapple Benefits: हिवाळ्यात अननस खल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात?

Nanded : जिल्हा परिषदेच्या जेवणात आळ्या, मुलांनी कडिपत्त्यासारख्या काढल्या अन्... नांदेडच्या शाळेतील धक्कादायक प्रकार; VIDEO व्हायरल

Mahapalika Election : भाजप ४४, शिंदेसेनेचे २२ उमेदवार बिनविरोध कसे? आयोगाचे थेट जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

SCROLL FOR NEXT