एससीओ शिखर परिषदेत सर्वांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला खडेबोल सुनावले saam TV
देश विदेश

PM मोदींनी घेतली पाकिस्तानच्या पंतप्रधानांची सर्वांसमोर शाळा; दहशतवादाच्या मुद्द्यावर दिला कडक मेसेज

pm modi warns pakistan on terrorism at sco summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर SCO शिखर परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासमोर रोखठोक भूमिका घेतली. दहशतवाद हा कोणत्याही देशासाठी मुत्सद्देगिरीचं शस्त्र होऊ शकत नाही, अशा शब्दांत मोदींनी ठणकावलं.

Nandkumar Joshi

शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर रोखठोक भूमिका स्पष्ट केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या उपस्थितीतच मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून कठोर संदेश दिला. दहशतवादाचा वापर मुत्सद्दीपणाचा शस्त्र म्हणून करणाऱ्या आणि दहशतवाद्यांना आश्रय तसेच पाठिशी घालणाऱ्या देशांना कठोर संदेश दिला गेला पाहिजे, असं मोदींनी ठणकावून सांगितलं. मोदींनी मंगळवारी किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये आयोजित एससीओच्या शिखर परिषदेत उपस्थितांना संबोधित केले. दहशतवाद हे संपूर्ण मानवतेसमोरील एक गंभीर आव्हान आहे, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरोधात कठोर भूमिका स्पष्ट केली. दहशतवादविरुद्धची लढाई ही दहशतवाद्यांवर कारवाई करण्यापुरती मर्यादित ठेवू नये. तर त्यामागील संपूर्ण नेटवर्क नष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे. दहशतवादाला रसद, भरती, कट्टरतावाद आणि आश्रय देणारी संपूर्ण यंत्रणा नष्ट करावी लागेल, असे मोदी म्हणाले. या सर्व गंभीर मुद्द्यांवर सर्व देशांनी आवाज उठवला पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या दुतोंडी धोरणाला स्थान मिळता कामा नये, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

दहशतवाद कुणाचीही 'धोरण संपत्ती' असू शकत नाही, असा कठोर संदेश दहशतवादाचा वापर 'धोरण शस्त्र' म्हणून करणाऱ्या आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांना दिला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली.

शांतता आणि सुरक्षेला भारताची प्राथमिकता

शांतता आणि सुरक्षा, संपर्क आणि संधी हे एससीओसंदर्भात भारताच्या दृष्टीकोनातून ३ प्रमुख आधारस्तंभ असल्याचा उल्लेख मागील बैठकीतही केला होता. भारत हा अफगाणिस्तानच्या नागरिकांच्या विकासासाठी आणि मानवतावादी दृष्टीकोनातून मदतीसाठी सातत्यानं योगदान देत आहे. यापुढेही ते देत राहील, असं मोदी म्हणाले.

ड्रग्ज तस्करी हे मोठे आव्हान

ड्रग्जची तस्करी हे मोठे आव्हान असल्याचे मोदी म्हणाले. ड्रग्ज तस्करी ही तरुणांसाठी आणि प्रादेशिक सुरक्षिततेसाठी धोकादायक असल्याचंही ते म्हणाले. सुरक्षिततेला धोका, संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करीशी संबंधित प्रकरणांचा निपटारा करणाऱ्या एससीओच्या ज्या यंत्रणा आहेत, त्यांच्या माध्यमातून सहकार्य अधिक मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचंही मोदींनी सांगितलं. या यंत्रणा केवळ बैठकांपर्यंत मर्यादित ठेवू नयेत, तर त्या सहकार्य आणि योग्य वेळी कारवाईचं प्रभावी माध्यम झाल्या पाहिजेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CSK head coach : धोनीच्या चेन्नईचा हेड कोच बदलला, महाराष्ट्रातील स्टारकडे जबाबदारी

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी

Walk According to Age: २० ते ६० वयानुसार रोज किती चालावं? जाणून घ्या आरोग्यासाठी योग्य चालण्याचं प्रमाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन; पोलिस दलात हळहळ

Banan Benefits: सकाळी रिकाम्या पोटी केळी खावी की नाही? जाणून घ्या हे ७ फायदे आणि परिणाम

SCROLL FOR NEXT