PM Modi Birthday Saam Tv
देश विदेश

PM Modi Birthday: मोदींच्या वाढदिवसानिमित्त आज 'या' राज्यात जन्मणाऱ्या मुलांना मिळणार सोन्याची अंगठी

आज देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा होत आहे.

साम वृत्तसंथा

चेन्नई : आज देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांचा वाढदिवस साजरा होत आहे. देशभरातून त्यांना शुभेच्छा येत आहेत. भाजप कडून देशभरात वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. तामिळनाडू भाजपकडूनही मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. वाढदिवसानिमित्त आज जन्मणाऱ्या मुलांना सोन्याच्या अंगठ्या देण्यात येणार आहेत.

तसेच ७२० किलो मासे वाटप करण्यात येणार आहेत. मत्स्यव्यवसाय आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी ही घोषणा केली आहे. 'आम्ही चेन्नईतील सरकारी RSRM रुग्णालयाची निवड केली आहे. या ठिकाणी जन्मलेल्या सर्व मुलांना सोन्याच्या अंगठ्या दिल्या जाणार आहेत. अंगठी सुमारे २ ग्रॅम सोन्याची असेल, ज्याची किंमत सुमारे ५००० रुपये असू शकते, असंही ते म्हणाले.

१५ ते २० मुलांना मिळणार अंगठी

१७ सप्टेंबर रोजी या रुग्णालयात १५ ते २० मुलांचा जन्म होऊ शकतो, त्यांंना ही अंगठी भेट म्हणून मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलांना अंगठी देऊन त्यांचे स्वागत करायचे आहे, अशी माहिती भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांनी दिली.

यासह दक्षिणेकडील राज्य पीएम मोदींच्या (Pm Narendra Modi) वाढदिवसानिमित्त मासे वाटणार आहेत. माशांच्या सेवनाला चालना मिळावी म्हणून माशांचे वाटप करण्यात येत असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. वाढदिवसानिमित्त ७२० किलो माशांचे वाटप करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय; रविंद्र चव्हाणांनी सांगितला पक्षाचा इतिहास

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT