Pm Modi Saam Tv
देश विदेश

PM Modi Ayodhya Visit: दिवाळीपूर्वी PM मोदी अयोध्या दौऱ्यावर; असा असेल संपूर्ण दिनक्रम

पीएम मोदी अयोध्येत भव्य म्युझिकल लेझर शो तसेच सरयू नदीच्या काठावर 3-डी होलोग्राफिक प्रोजेक्शन मॅपिंग शोचा आनंद घेतील.

वृत्तसंस्था

PM Modi Ayodhya Visit: दिवाळीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) आज अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर असणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या जागेची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते भगवान श्री राम यांचे दर्शन घेणार आहे. पूजेनंतर पंतप्रधान मोदी भव्य दीपोत्सव सोहळ्याला सुरुवात करतील. असे सांगण्यात आले आहे की पंतप्रधान मोदी सरयू नदीच्या नवीन घाटावर आरती तसेच 3-डी होलोग्राफिक प्रोजेक्शन मॅपिंग शो देखील पाहतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा संपूर्ण दिनक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सायंकाळी ५ वाजता भगवान श्री रामलला यांचे दर्शन आणि पूजा करतील. यानंतर ते श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राची पाहणी करण्यासाठी बाहेर पडतील.

तीर्थक्षेत्राची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी ५:४५ वाजता प्रतिकात्मक भगवान श्री राम यांचा राज्याभिषेक करतील.

राज्याभिषेकानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी साडेसहा वाजता सरयू नदीच्या नवीन घाटावर पोहोचतील आणि येथे आरतीचे दर्शन घेतील. आरतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य दीपोत्सव सोहळ्याला सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम अनेक अर्थांनी खास असणार आहे.

यावर्षी दीपोत्सवाच्या सहाव्या आवृत्तीचे आयोजन केले जात असून, या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान स्वत: अयोध्येत येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या विशेष प्रसंगी 15 लाखाहून अधिक दिवे प्रज्वलित केले जातील. दीपोत्सवादरम्यान पाच अॅनिमेटेड तबल्या आणि अकरा रामलीला झाकण्यांसह विविध राज्यांतील नृत्यप्रकारही दाखवण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे भव्य म्युझिकल लेझर शो तसेच सरयू नदीच्या काठावर 3-डी होलोग्राफिक प्रोजेक्शन मॅपिंग शोचा आनंद घेतील.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT