Amit Shah On PM Modi Saam Tv
देश विदेश

Amit Shah On PM Modi: देशातील 140 कोटी लोकांना स्वावलंबी बनवणं पंतप्रधान मोदींचे उद्दिष्ट: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Amit Shah in Ahmedabad : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील 140 कोटी लोकांना स्वावलंबी बनवायचे आहे आणि त्यासाठी ते समर्पित भावनेने काम करत आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले आहेत.

Satish Kengar

Amit Shah in Ahmedabad : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील 140 कोटी लोकांना स्वावलंबी बनवायचे आहे आणि त्यासाठी ते समर्पित भावनेने काम करत आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले आहेत. ते अहमदाबादमध्ये प्रधानमंत्री स्वानिधी योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करताना असं म्हणाले आहेत.

शाह म्हणाले की, पंतप्रधान मोदींना अंतराळ तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवायचे आहे. गरिबांना स्वावलंबी बनवणे हाही त्यांचा उद्देश आहे. गरीब वर्गातील लोकांना मोदी सरकारचा खूप फायदा झाला आहे. या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'पंतप्रधान गरिबांसाठी पूर्ण समर्पित भावनेने काम करत आहेत'

ते म्हणाले की, पंतप्रधानांनी देशातील 60 कोटी गरीब लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी पूर्ण समर्पणाने काम केले आहे. गेल्या नऊ वर्षांत सुमारे तीन कोटी लोकांना घरे मिळाली आहेत. चार कोटी लोकांना वीज कनेक्शन मिळालं आहे. 10 कोटींना गॅस सिलिंडर मिळाले आहेत. 12 कोटी लोकांना शौचालये मिळाली आहेत, 80 कोटी लोकांना मोफत रेशन मिळाले आहे आणि 60 कोटी लोकांना 5 लाख रुपयांच्या आरोग्य विमा योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.  (Latest Marathi News)

‘देशातील गरीब वर्ग स्वावलंबी जीवन जगत आहे’

अमित शाह म्हणाले की, येथे दीड लाखांहून अधिक लोकांना प्रधानमंत्री स्वानिधी योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेंतर्गत लहान व्यावसायिकांना आणि लहान दुकानदारांनाही तारण न घेता आर्थिक मदत दिली जात आहे. देशातील गरीब आता स्वावलंबी जीवन जगत आहेत.

यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी सुरू केलेल्या योजनांचा देशातील गरिबांना मोठा फायदा झाला आहे. अमित शाह आपल्या मतदारसंघाच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री पटेल यांच्यासोबत साबरमती रेल्वे मैदानावर क्रीडा स्पर्धेत भाग घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT