PM Mahinda Rajapaksa’s ancestral home in Madamulluna has been set on fire, Sri lanka crisis News, Sri lanka crisis Latest Marathi News Twitter/@NewsWireLK
देश विदेश

Video : श्रीलंकेत भडका! आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधानांचं वडिलोपार्जित घर पेटवलं

Sri Lanka Violence: आक्रमक आणि संतप्त झालेल्या सरकारविरोधी आंदोलकांनी राजपक्षे परिवाराचं वडिलोपार्जित घर आगीच्या हवाली केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोलंबो: भारताचा शेजारी देश श्रीलंका प्रचंड राजनैतिक संकटाचा सामना करत आहे. वाढती महागाई, अन्नाचा आणि जीवनावश्यक वस्तूंचा, भारनियमन, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी अशा अनेक समस्यांमुळे देशात अराजकता माजली आहे. अशात श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. (Sri Lankan PM Mahinda Rajapaksa resigns) मात्र श्रीलंकेचे राष्ट्रपती तथा महिंदा राजपक्षे यांचे लहान भाऊ गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. अशात आक्रमक आणि संतप्त झालेल्या सरकारविरोधी आंदोलकांनी राजपक्षे परिवाराचं वडिलोपार्जित घर आगीच्या हवाली केलं आहे. (PM Mahinda Rajapaksa’s ancestral home in Madamulluna has been set on fire)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार संतप्त जमावाने खासदार सनथ निशांत, महिपाल हेरथ आणि माजी मंत्री जॉन्स्टन फर्नांडो यांची घरं पेटवून दिली. आंदोलकांनी हंबनटोटा येथील मेदामुल्लाना इथे पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती तथा त्यांचे धाकटे भाऊ गोटबाया राजपक्षे यांचे वडिलोपार्जित घरही जाळले. (Fire) त्याचप्रमाणे बंदरवेला येथील खासदार थिसा कुट्टियाराची यांच्या रिटेल स्टोअरलाही आग लावण्यात आली तर मंत्री कांचना विजेसेकेरा यांचे मतारा येथील घर आंदोलकांनी फोडले. २२ दशलक्ष लोकसंख्या असलेले दक्षिण आशियाई बेट म्हणजे श्रीलंका हे राष्ट्र १९४८ मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची सर्वात वाईट आर्थिक मंदीला सामोरे जात आहे. श्रीलंकेत नियमित वीज खंडित होत आहे, याशिवाय अन्न, इंधन आणि औषधांचा तीव्र तुटवडा आहे.

पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी देशातील सर्वात वाईट आर्थिक संकटाच्या (Crisis) पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. एका निवेदनात, त्यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की देशभरात अनेक आठवड्यांच्या व्यापक निषेधानंतर, अंतरिम एकता सरकार तयार करण्यात मदत करण्यासाठी ते राजीनामा देत आहेत.

श्रालंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी एका विशेष बैठकीत देशातील चालू असलेल्या राजकीय संकटावर उपाय म्हणून सत्तेतून पायउतार होण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. श्रीलंकेतील अभूतपूर्व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी अंतरिम प्रशासन तयार करण्यासाठी संघर्षग्रस्त सरकारवर वाढत्या दबावादरम्यान हे पाऊल उचलण्याता आले आहे. श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी ट्विटरवर लिहिले की, “तत्काळ प्रभावीपणे मी पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवला आहे.

दरम्यान, कोलंबोच्या डाउनटाउनमधील सी-फ्रंट गॅले फेस प्रोमेनेड येथे राष्ट्रपतींच्या कार्यालयाबाहेर सरकारला पाठिंबा देणारे गट आणि आंदोलक यांच्यात झालेल्या संघर्षानंतर श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी देशव्यापी कर्फ्यू लागू केला. ९ एप्रिलपासून श्रीलंकेत हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. देशात जीवनावश्यक आयातीसाठी सरकारकडे पैसे संपले आहेत आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी आणीबाणी जाहीर केली. राष्ट्रपती गोटाबाया आणि पंतप्रधान महिंदा यांनी लोकांना संयम बाळगण्याची विनंती केली आणि म्हणाले की, लक्षात ठेवा की हिंसा केवळ हिंसाचाराला जन्म देते, असे म्हणत आर्थिक संकटाला आर्थिक समाधानाची आवश्यकता आहे ज्याचे निराकरण करण्यासाठी त्यांचे सरकार वचनबद्ध आहे असंही ते म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

SCROLL FOR NEXT