PM Kisan Samman Nidhi Yojana  Saam Tv
देश विदेश

PM Kisan Yojna: शेतकऱ्यांना 1 एप्रिलपासून पीएम किसान योजनेत जास्त निधी मिळणार? 6 हजारांऐवजी मिळणार...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान निधीची रक्कम वाढवण्याची घोषणा करू शकतात.

साम टिव्ही ब्युरो

PM Kisan Yojna : केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान निधीची रक्कम वाढवण्याची घोषणा करू शकतात.

पीएम किसान योजनेअंतरर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये मिळतात. या रकमेत वाढ होण्याची सूत्रांची माहिती आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सरकार हा निर्णय घेऊ शकते. 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याकडे शेतकरी वर्गाचं लक्ष असेल. (Latest Marathi News)

सध्या पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दिले जात आहेत. मात्र आता शेतकऱ्यांना तीन ऐवजी चार हप्ते मिळण्याची शक्यता आहे. सध्या दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये ट्रान्सफर केले जातात. मात्र बदलानंतर दर तिमाहीला 2000 रुपये दिले जातील. म्हणजेच शेतकऱ्यांना 6000 रुपयांऐवजी 8000 रुपये वार्षिक देण्यात येतील.

पीएम किसान योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या पैशांसाठी मोठा हातभार लागतो. बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना रोख रकमेची गरज असते. त्यात आता पीएम किसान योजनेची रक्कम वाढवल्यास एप्रिलमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा 2000 रुपयांचा हप्ता येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी की जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

SCROLL FOR NEXT