PM Modi Greece Visit Saam Tv
देश विदेश

PM Modi Greece Visit: ग्रीसने पंतप्रधान मोदींना ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर’ पुसराकारने केलं सन्मानित

Grand Cross of the Order of Honour: ग्रीसने पंतप्रधान मोदींना ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर’ पुसराकारने केलं सन्मानित

साम टिव्ही ब्युरो

Grand Cross of the Order of Honour: ग्रीसच्या राष्ट्रपती कॅटेरिना साकेलारोपौलो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर’ पुरस्कार प्रदान केला. ऑर्डर ऑफ ऑनर पुरस्काराची सुरुवात 1975 मध्ये झाली. या पुरस्कारावर तारकेच्या समोरच्या बाजूस देवी अथेनाचे मस्तक कोरलेले असून "केवळ सदाचारींना सन्मानित केले जावे" अशा अर्थाचे वचन देखील लिहिलेले आहे.

ग्रीसच्या राष्ट्रपतींनी आजवर देशाचा सन्मान वाढवण्यात योगदान देणारे ग्रीसचे पंतप्रधान आणि इतर प्रतिष्ठित व्यक्तींना ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर’ प्रदान केला आहे. या पुरस्काराच्या पत्रकात म्हटले आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून भारतातील मैत्रीभाव जपणाऱ्या लोकांचा सन्मान केला जात आहे."

“या भेटीच्या निमित्ताने, अथकपणे आपल्या देशाची जागतिक पोहोच वाढवणाऱ्या, भारताच्या आर्थिक प्रगती आणि समृद्धीसाठी पद्धतशीरपणे काम करणाऱ्या आणि धाडसी सुधारणा घडवून आणणाऱ्या भारताच्या पंतप्रधानांचा ग्रीक राज्य सन्मान करते, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.  (Latest Marathi News)

पंतप्रधान एक मुत्सद्दी राजकारणी आहेत, ज्यांनी पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदल या मुद्दांना आंतरराष्ट्रीय क्रियाकलापांच्या सर्वोच्च प्राधान्यांमध्ये जागा मिळवून दिली आहे .” असेही या पत्रकात म्हटले आहे.

परस्पर हिताच्या क्षेत्रात ग्रीक-भारतीय मैत्रीच्या धोरणात्मक वाढीच्या कामात पंतप्रधान मोदी यांच्या निर्णायक योगदानाचीही दखल घेण्यात आली आहे. पंतप्रधानांनी ग्रीसच्या राष्ट्रपती कॅटेरिना साकेलारोपौलो, ग्रीसचे सरकार आणि ग्रीसची जनता यांचे आभार मानले आणि ते एक्स वर पोस्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूकदार संघटना आक्रमक

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT