Exit Poll Scam Saam Tv
देश विदेश

Stock Market Scam: एक्झिट पोलचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात; शेअर बाजारातील घसरणीची चौकशी व्हावी, याचिकेतून मागणी

Stock Market Crash: 4 जून रोजी शेअर बाजारात अचानक घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले होते. आता याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Satish Kengar

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी 4 जून रोजी शेअर बाजारात अचानक घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले होते. आता याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये केंद्र सरकार आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांना या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

अधिवक्ता विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत सांगण्यात आलं की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात आणखी एक मोठी घसरण पाहायला मिळाली. याचा एक्झिट पोलशी सखोल संबंध आहे आणि त्याची चौकशी व्हायला हवी.https://youtu.be/1nnKcY4JQBU?si=q_XPl922XA4sPrdl

याचिकाकर्ते विशाल तिवारी म्हणाले की, 'शेअर मार्केटमध्ये पुन्हा अस्थिरता दिसून आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेअर बाजारातील घसरणीमुळे 20 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे नियामक यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याचिकेत म्हटले आहे की, लोकसभेच्या एक्झिट पोलच्या घोषणेनंतर शेअर बाजारात तेजी आली होती, मात्र प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर बाजार कोसळला. त्यामुळे नियामक प्राधिकरण आणि त्याच्या यंत्रणेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत चौकशी होण्याची गरज आहे.

दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 6 जून रोजी पत्रकार परिषदेत याबाबत गंभीर आरोप केले होते. त्यांनी दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देशातील कथित सर्वात मोठ्या शेअर बाजार घोटाळ्यात थेट सहभागी होते. ज्यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. हे गुन्हेगारी कृत्य असल्याचे सांगत त्यांनी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Puff Recipe: घरच्या घरी बनवा खुसखुशीत पनीर पफ; चहासोबत लागेल भन्नाट चव

महावितरणचा हलगर्जीपणा! विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Microsoft Layoffs: 4,800 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं; Microsoft च्या निर्णयामागचं खरं कारण काय?

Shweta Tiwari: ब्लॅक आउटफिटमध्ये श्वेता तिवारीचा एलिगंट लूक; स्टायलिश लूकने चाहत्यांची जिंकली मनं

Maharashtra News Live Update: नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला

SCROLL FOR NEXT