West Bengal Governor Saam Tv
देश विदेश

West Bengal News: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक छळाचा आरोप; कर्नाटकचे खासदार प्रज्ज्वल रेवन्नाविरोधात लुकआउट नोटीस जारी

Physical Harassment Allegations On West Bengal Governor: पश्चिम बंगालचे राज्यपाल सिवी घोष यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. राजभवनच्या एका महिला कर्मचाऱ्याने त्यांच्यावर हा आरोप केला आहे.

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप साम टीव्ही, नवी दिल्ली

पश्चिम बंगालचे राज्यपाल सिवी घोष यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. राजभवनच्या एका महिला कर्मचाऱ्याने राज्यपालांवर लैंगिक छळाचा आरोप केल्याची माहिती मिळत (Physical Harassment Allegations On West Bengal Governor) आहे. या महिला कर्मचाऱ्याने हेअर स्ट्रीट पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दिली आहे. परंतु, राज्यपालांनी महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

या आरोपांवर बोलताना राज्यपाल म्हणाले आहेत की, मला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत, सत्याचा विजय होईल, असा विश्वास देखील राज्यपाल सिवी घोष (West Bengal Governor Sivi Ghosh) यांनी व्यक्त केला आहे. मी अशा खोटे नैरेटिव तयार करून पसरवण्याला घाबरत नाही. माझी बदनामी करून कोणाला निवडणुकीचा फायदा घ्यायचा असेल, तर देव त्यांचं भला करो अशी प्रतिक्रिया राज्यपाल घोष यांनी दिली आहे.

मी भ्रष्टाचार आणि हिंसाचाराच्या विरोधातील लढा थांबवू शकत नाही, असं देखील राज्यपाल (Sivi Ghosh) यावेळी म्हणाले आहेत. टीएमसी खासदार सागरिका घोष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणी राज्यपालांना जाब विचारणार का? असा प्रश्न विचारला आहे. पश्चिम बंगालचे राज्यपालांवर केलेल्या लैगिंक छळाच्या आरोपामुळे तेथील वातावरण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे.

खासदार प्रज्ज्वल रेवन्नाविरोधात लुकआउट नोटीस

महिलांचं लैंगिक सोषण आणि कथित व्हिडिओ प्रकरणामध्ये JDS खासदार प्रज्ज्वल रेवन्ना (Karnataka MP Prajwal Revanna) यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे, अशी माहिती कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी माहिती दिली आहे. परदेशात असल्याने ७ दिवसांचा वेळ मिळावा, अशी मागणी प्रज्जल रेवन्ना यांच्याकडून एसआयटीला केली गेली होती. मात्र, २४ तासांपेक्षा जास्त वेळ देण्याची तरतूद नसल्याची माहिती परमेश्वर यांनी दिली आहे. कर्नाटक सरकारकडून सर्व विमानतळ आणि बंदर प्रशासनाला माहिती दिली गेले आहे. या प्रकरणातील प्रज्ज्वल रेवन्ना यांचा माजी ड्रायव्हर बेपत्ता झाला आहे. सध्या त्याचाही शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urmila Kanetkar: ती परी असमानीची....; निसर्गरम्य वातावरण आणि उर्मिलाच्या मनमोहक अदा

Maratha Reservation: दोन सप्टेंबरचा GR हा फक्त मराठवाड्यापुरताच; मराठा आरक्षणावर बावनकुळेंचा मोठा खुलासा

Maharashtra Live News Update: मनमाडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शानदार पथ संचालन

Saturday Horoscope: मिथूनसह ५ राशींचे मन अस्वस्थ राहिल! नुकसान होईल, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Pune Tourism : महाराष्ट्रात राहून परदेशाचा अनुभव घ्यायचाय? मग दिवाळीच्या सुट्टीत पुण्याजवळील 'हे' ठिकाण पाहाच

SCROLL FOR NEXT