pimpri chinchwad, police, arrests saam tv
देश विदेश

Madhya Pradesh Crime News: निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती; १० वर्षांच्या चिमुकलीवर क्रूरतेने सामूहिक अत्याचार, घटनेनं मध्य प्रदेश हादरलं

Crime News: या घटनेत १० वर्षांच्या अल्पवयीन चिमुकलीवर सामूहीक अत्याचार करण्यात आलाय.

Ruchika Jadhav

Madhya Pradesh News: निर्भया सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे काही वर्षांपूर्वी संपूर्ण देश हादरुन केला होता. आता पुन्हा एकदा अशीच एक काळीज सुन्न करणारी घटना समोर आली आहे. या घटनेत १० वर्षांच्या अल्पवयीन चिमुकलीवर सामूहीक अत्याचार करण्यात आलाय. आरोपींनी निर्भया प्रमाणे या चिमुकलीसोबत देखील क्रूरतेचा कळस गाठलाय. (Latest Madhya Pradesh Crime News)

अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात ही घटना घडलीये. नराधमांनी १० वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार केल्यानंतर तिच्या शरीरावर दातांनी चावा घेतला आहे. दातांचे वन चिमुकलीच्या शरीरावर उमटलेत. तसेच त्यांनी निर्भया प्रमाणे चिमुकलीच्या प्रायवेट पार्टमध्ये लाकडी काठी घुसवल्याची माहिती देखील समोर आलीये.

आजतकच्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी या बाबत अधिक माहिती देत म्हटलं की, दोन्ही आरोपी मंदिर व्यवस्थापनात रोजंदारीवर काम करतात. गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारात नराधम १० वर्षांच्या चिमुकलीला शारदा मंदिर परिसरातील डोंगराळ भागात घेऊन गेले होते. चिमुकलीला खाऊ आणि खेळणी देणार असं म्हणत त्यांनी तिला डोंगराळ भागात नेलं.

रविंद्र आणि अतूल अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. दोघेही ३० वर्षांचे असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. तसेच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सूनावण्यात आली आहे. या घटनेनंतर मंदिरातून या दोघांना नोकरीवरुन देखील काढून टाकण्यात आलं आहे.

या घटनेवर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यांनी मुलीवर चांगले उपचार करण्याचे आदेश दिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दररोज एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात होतील आश्चर्यकारक ५ बदल

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT