Philippines Boat Fire News  Saam tv
देश विदेश

Philippines Boat Fire News: फिलीपीन्समध्ये प्रवाशांनी भरलेल्या भलामोठ्या जहाजाला आग, ३१ जणांचा मृत्यू, ७ प्रवासी बेपत्ता

दक्षिण फिलीपीन्समध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. दक्षिण फिलीपीन्समध्ये २५० प्रवाशांनी खचाखच भरलेल्या जहाजाला आग लागल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Philippines Boat Fire Latest News : दक्षिण फिलीपीन्समध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. दक्षिण फिलीपीन्समध्ये २५० प्रवाशांनी खचाखच भरलेल्या जहाजाला आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर जहाज पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. या घडलेल्या दुर्घटनेत ३१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेने दक्षिण फिलीपीन्समध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

फिलीपीन्समधील बेसिलनच्या दक्षिण द्विपचे राज्यपाल जिम हटामन यांनी सांगितले की, जहाजाला आग लागल्यानंतर काही प्रवाशांनी पाण्यात उड्या मारल्या आहेत. पाण्यात उडी मारलेल्या या प्रवाशांना नौदल आणि मच्छीमारांसहित अन्य दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे.

'या दुर्घटनेनंतर पाण्यात उड्या मारलेले ७ जण बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्या ७ प्रवाशांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेत पाण्यात बुडालेली जहाज बसलिन किनाऱ्यावर आणण्यात आली आहे. तर एका जहाजाच्या माध्यमातून १८ मृतदेह किनाऱ्यावर आणण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.

घटनेचा शोध सूरू

हटामन यांनी पुढे सांगितले की, 'जहाजाला आग (Fire) नेमकी कशी लागली, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच या जहाजावरील अतिरिक्त प्रवाशांची माहिती मिळाली नाही. जहाज हे जांबोआंगा येथून सुलू या शहराकडे चालले होते. या दुर्घटनेत २३ जण जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Earthquake : हाहाकार! भूकंपाच्या धक्क्याने 'हा' देश हादरला; १०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

Marathi Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, विवाह सोहळ्यातील खास VIDEO आला समोर

Ladki Bahin Yojana : आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; बोगस लाडक्या बहिणींकडून पैशांची वसुली, सरकारचा जिल्हाधिकाऱ्यांना थेट आदेश

Thane Waterfall : पावसाळ्यात माथेरान, महाबळेश्वर विसरा; ठाण्यात लपलेला 'हा' धबधबा वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT