Plane Crash Saam Tv News
देश विदेश

America Plane Crash: सलग दुसर्‍या दिवशी अमेरिकेत दुर्घटना, गजबजलेल्या मॉलजवळ विमान कोसळलं; VIDEO

USA Plane Crash Updates: अमेरिकेत विमान अपघाताचे सत्र सुरूच आहे. अमेरिकेतील फिलाडेल्फियामधील एका शॉपिंग मॉलजवळ शनिवारी पहाटे विमान कोसळले. ज्यात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Bhagyashree Kamble

अमेरिकेत विमान अपघाताचे सत्र सुरूच आहे. अमेरिकेतील फिलाडेल्फियामधील एका शॉपिंग मॉलजवळ शनिवारी पहाटे विमान कोसळले. मिडिया रिपोर्टनुसार, या विमान अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताच्या वेळी विमानात किमान दोन प्रवासी होते. हा धक्कादायक अपघात ईशान्य फिलाडेल्फियामध्ये रोझवेल्ट मॉलजवळ घडला आहे. या परिसरात आगीचे लोट पाहायला मिळत असून, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सीबीएस न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी विमानात दोन जण होते. हे विमान ईशान्य फिलाडेल्फिया विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर मिसूरी येथील स्प्रिंगफील्ड - ब्रॅन्सन राष्ट्रीय विमानतळाकडे जात होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती आहे. हे विमान मॉलच्या परिसरात क्रॅश झालं. त्यानंतर आगीनं रौद्ररूप धारण केलं. परिसरात आगीचे लोट आणि नागरीकांमध्ये भीती पाहायला मिळाली.

मिडिया रिपोर्टनुसार, विमान पेनसिल्व्हेनियाच्या फिलाडेल्फिया येथील रोझवेल्ट मॉलच्या बाहेर कोसळले. क्रॅश झालेले विमान हे वैद्यकीय विमान लिअरजेट ५५ होते. जे फिलाडेल्फिया ते स्प्रिंगफील्ड, मिसूरी येथे उड्डाण करत होते. विमानात किती लोक होते आणि मृतांची अधिकृत माहिती समोर येणं बाकी आहे. या प्रकरणी FAA आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेन सेफ्टी बोर्ड NTSBच्या नेतृत्वाखाली घटनांची चौकशी करीत आहेत.

यासंदर्भात पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो सांगतात, मी फिलाडेल्फियाच्या महापौरांशी बोललो आहे. माझी टीम सर्व जबाबदार एजन्सींच्या संपर्कात आहे. ईशान्य फिली येथील खाजगी विमान अपघाताच्या मदतीसाठी आम्ही कोणत्याही प्रकारे मदत करण्यास तयार आहोत. असं ट्विट करत त्यांनी माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजप महायुतीच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांचा उद्या अर्ज दाखल

Mumbai-Pune : अंधाऱ्या बोगद्यातून वाट काढत पोहचा 'या' धबधब्यावर, मुंबई-पुण्याजवळच पाहाल हे आरस्पानी सौंदर्य

फ्री फायरच्या आयडीवरून वाद अन् थेट गळ्यावर चाकू; घटनेने खळबळ

Fashion Tips For Women: ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याच्या मॉडर्न स्टाईल; 5 हटके आणि स्टायलिश पॅटर्न्स

मला प्रचंड त्रास दिला जातोय, आता संयमाचा बांध तुटणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT