Petrol-Diesel Price Saam TV
देश विदेश

Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार? केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची उचललं पाऊल

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी तेल कंपन्यांना इंधनाचे दर कमी करण्याचे आवाहन केले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Petrol-Diesel Prices: पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर सर्वसामन्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. इंधनाच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम इतर वस्तूंवरही होतो. मात्र येत्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे. कारण केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी तेल कंपन्यांना इंधनाचे दर कमी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी व्हॅट कमी न करणाऱ्या राज्य सरकारांवरही निशाणा साधला.

आंतरराष्ट्रीय किमतीत वाढ होऊनही, आम्ही तेलाच्या किमती मॅनेज करू शकतो, कारण केंद्राने नोव्हेंबर 2021 आणि मे 2022 मध्ये उत्पादन शुल्क कमी केले होते, असं हरदीपसिंग पुरी यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

काही राज्य सरकारांनी तरीही व्हॅट कमी केला नाही आणि तिथे तेलाच्या किमती चढ्या आहेत. हरदीप सिंग पुरी म्हणाले की, मी तेल कंपन्यांना विनंती करतो की जर आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती नियंत्रणात असतील आणि त्यांच्या कंपन्यांची अंडर-रिकव्हरी थांबली असेल तर भारतातील तेलाच्या किमती कमी कराव्यात.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी रविवारी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे एका कार्यक्रमात उपस्थित होते. तिथे त्यांनी म्हटलं की, भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक आहे. त्यांनी यावर भर दिला की भारत देशांतर्गत ऑईल आणि गॅसच्या शोधाचा पाठपुरावा करत आहे. पर्यायी ऊर्जा स्त्रोतांकडे संक्रमण करत आहे आणि ऊर्जा सुरक्षिततेचा मार्ग म्हणून गॅस आणि ग्रीन हायड्रोजनचा वापर करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT