नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने २ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर केला. याविरोधात आता पेट्रेोल पंप चालकांनी आक्रमक भूमिका घेतलीय. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीला यातून यातून वगळण्याची मागणी पेट्रोल पंपचालकांनी केलीय. सरकारनं UPIच्या दोन हजारांपेक्षा अधिकच्या व्यवहारांवर 0.4 टक्के शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतलाय. त्याला सर्व स्तरातून विरोध होत असला तरी पेट्रोल पंप चालकांनी थेट देशपातळीवर या निर्णयाला विरोध केलाय.
UPI शुल्काविरोधात पंप चालक आक्रमक
अतिरिक्त शुल्क निर्णयामुळे राज्यातील 7,500 पेट्रोल पंपांना दररोज सुमारे 250 रुपये ते 590 रुपयांपर्यंतचे थेट नुकसान सहन करावे लागू शकते. हे नुकसान महिन्याला अंदाजे 7,500 ते 17,700 रुपयांच्या घरात जाते. एका पेट्रोल पंपावर दररोज सरासरी 100 ते 200 ग्राहक हे 200 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे इंधन खरेदी UPI द्वारे करतात.
खरंतर, पेट्रोल पंप डीलर्सनी कमिशन वाढवण्याची मागणी याआधीच केलीये. मात्र, अपेक्षित वाढ न झाल्यानं आता 5 रुपयांचे अतिरिक्त शुल्क स्वतःच्या खिशातून भरण्यास पंपचालकांनी नकार दिलाय. त्यामुळे अनेक पंपचालकांनी कॅशनं व्यवहार करण्याची भूमिका घेतलीय. आणि यामुळे पंपचालक आणि ग्राहकांमध्ये वाद होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे यावर सरकारनं वेळीच तोडगा काढण्याची गरज आहे,.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.