Petrol Diesel Latest Price Saam TV
देश विदेश

Petrol-Diesel Prices : कच्च्या तेलाचे दर पुन्हा घसरले; पेट्रोल डिझेल स्वस्त की महाग? पाहा आजचा भाव

ब्रेंट क्रूडची किंमत आज प्रति बॅरल 99.7 डॉलर इतकी झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत चढ-उतार होत आहे. गेल्या 24 तासातही आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crud Oil) किंमतीत लक्षणीय घट झाली. ब्रेंट क्रूड 3 महिन्यांत दुसऱ्यांदा प्रतिबॅरेल 100 डॉलरच्या खाली आले आहे. कच्च्या तेलाच्या दरात घसरण होताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) दर जारी केलेत. (Petrol Diesel Latest Price Today)

कच्च्या तेलाच्या सततच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल डिझेलचे किरकोळ दर जारी केले. त्यानुसार आज सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. विशेष बाब म्हणजे 6 एप्रिलपासून कंपन्यांनी त्याच्या किंमती वाढवल्या नाहीत.

काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 140 डॉलरच्या वर गेल्या होत्या. मंगळवारी सकाळी जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरेल 105.9 डॉलर इतकी होती. जी आज प्रति बॅरल 99.7 डॉलर इतकी झाली आहे. (Petrol Diesel Price Today)

4 प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई - मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 95.84 रुपयांनी विकलं जातंय.

दिल्ली - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.

चेन्नई - चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.

कोलकाता - कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये इतका आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

SCROLL FOR NEXT