Petrol Diesel Price Today  Saam Tv
देश विदेश

पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? पाहा तुमच्या शहरातील इंधनाचे दर

मंगळवारी सकाळी पुन्हा कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाली

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलांच्या (Crud Oil) किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी पुन्हा कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाली. त्यामुळे कच्चा तेलांच्या किंमती प्रतिबॅरेल 122 डॉलरच्या पार गेल्या आहेत. दुसरीकडे कच्चा तेलांच्या किंमतीत वाढ होताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) दर जाहीर केले आहे. (Petrol Diesel Price Today in Mumbai Maharastra)

मंगळवारी सकाळी पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार, पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आला नाही. पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. नुकतेच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर पेट्रोलच्या दरात कमाल 9 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 7 रुपयांनी घट झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत असलेले कच्च्या तेलाचे भाव पाहता भारतात लवकरच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत.येत्या काळात त्यामध्ये आणखी वाढ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, सोमवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.27 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे.

4 प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई - मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 95.84 रुपयांनी विकलं जातंय.

दिल्ली - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.

चेन्नई - चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.

कोलकाता - कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये इतका आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - उत्तर सोलापूर तालुक्यातील दुष्काळी भागांची पाहणी अंतिम टप्प्यात

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT