Petrol Diesel Price SaamTV
देश विदेश

Petrol Diesel: आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घसरण सुरुच; पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाणून घ्या

सरकारी तेल कंपन्यांनी सलग तीन महिन्यांपासून तेलाच्या किंमती स्थिर ठेवल्या आहेत.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घसरण सुरुच आहे. काल शुक्रवारीही तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. घसरणीनंतर देशातील पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या किंमतीत बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी सलग तीन महिन्यांपासून तेलाच्या किंमती स्थिर ठेवल्या आहेत. मागणीवर परिणाम झाल्याने कच्च्या तेलाच्या फ्युचर्सच्या किंमती घसरल्या आहेत. ब्रेंट क्रूड ०.४१ टक्क्यांनी घसरून १०४.२२ डॉलर प्रति बॅरेलवर आले. युएस डब्लूटीआई ही ०.५५ टक्क्यांनी घसरून १०२.१६ डॉलरवर आला. देशांतर्गत बाजारात कच्च्या तेलाची किंमत १.२२ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरेल ८,०९५ रुपये झाली.

ब्रेंट क्रूड तेलाच्या घसरणीसह बंद झालेला हा आठवडा सलग दुसरा आठवडा आहे. गुरुवारी किंमत ४ टक्क्यांनी वाढली होती, मात्र शुक्रवारी पुन्हा घसरण झाली. पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या काही आठवड्यापासून स्थिर आहेत. दिल्लीत पेट्रोल (Petrol) ९६.७२ रुपये आणि डिझेलचा दर ८९.६२ रुपये आहे. तर मुंबईत पेट्रोल १११ रुपयांच्यावर गेले आहे.

आजचे भाव काय आहेत?

- पोर्टब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लीटर

- दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

- मुंबईमध्ये पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल रुपये 97.28 रुपये

- चेन्नईमध्ये पेट्रोल 96.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 प्रति लिटर

- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर

- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये लिटर लिटर

– तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर

– पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

- हैदराबादमध्ये 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT