Petrol Diesel Price SaamTV
देश विदेश

Petrol Diesel: पेट्रोल-डिझेल महागणार? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

जाणून घ्या प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या तीन दिवसांनंतर वाढ झाली आहे. त्यांनतर देशातील सरकारी तेल कंपन्यांनीही सोमवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाल्यास, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 87.27 डॉलर इतकी झाली आहे. तर WTI प्रति बॅरल 79.84 डॉलरवर आहे. केंद्र सरकारने शेवटच्या वेळी 21 मे रोजी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलवरील (Diesel) उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. यानंतर लगेचच काही राज्य सरकारांनीही व्हॅट कमी केला. (Petrol Diesel Latest Price)

आजचे भाव काय आहेत?

– दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईमध्ये पेट्रोल 106.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

– बेंगलुरुमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

– लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

– जयपुरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

– पोर्टब्‍लेयरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर

– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

– पटनामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

– चंडीगढ़मध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

– कोलकातामध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 आणि डिझेल डीजल 96.52 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लोणावळ्यात अखेर पावसाची दमदार हजेरी

Rain Alert : पावसानं जोर पकडला, पुढचे २४ तास महत्वाचे; मुंबई- पुण्यासह ३० जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Thailand Job Scam: थायलंडमध्ये नोकरीचं आमिष, ८०० भारतीय ओलीस; 'गोल्डन ट्रँगल'च्या जाळ्यात तरुण कसे अडकले?

वजन कमी होत नाही, चेहरा पण डल दिसतोय? सकाळी प्या 'हे' हेल्दी ड्रिंक

Health Care : पावसाळ्यात १०० आजारांवर एक उपाय 'आयुर्वेदिक चहा', वाचा फायदे

SCROLL FOR NEXT