Petrol Diesel Latest Price, Fuel Price updates Saam TV
देश विदेश

Petrol Diesel: पेट्रोल डिझेल होणार स्वस्त? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाणून घ्या

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - सरकारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवीन दर जाहीर केले आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आजही वाहनांच्या इंधनाचे दर स्थिर असून सर्वसामान्यांना अनेक ठिकाणी पेट्रोलसाठी 100 रुपयांहून अधिक दर मोजावे लागत आहेत. त्याचवेळी, आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे.

कच्च्या तेलाच्या दर प्रति बॅरल 92 डॉलरच्या खाली गेले आहे. तर ब्रेंट क्रूडचे दर आज प्रति बॅरल 91.59 डॉलर इतके आहे. त्याच वेळी, WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल 85.53 डॉलर वर कायम आहे.

हे देखील पाहा -

आजचे भाव काय आहेत?

– दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईमध्ये पेट्रोल 106.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– बेंगलुरुमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

– चंडीगढ़मध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

– कोलकातामध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

– पोर्टब्‍लेयरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर

– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

– पटनामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

– लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

– जयपुरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

– तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 आणि डिझेल डीजल 96.52 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

America: अमेरिकेच्या B-2 बॉम्बर्सचा इराणवर हल्ला, 2000 पाउंड वजनाचे 64 बॉम्ब टाकले

Maharashtra Live News Update : अजित पवारांच्या विमानातील दोन्ही वैमानिकांचे ट्रॅक रेकॉर्ड तपासले जाणार

Carrot Juice For Glowing Skin: चेहरा दिवस- रात्र चमकेल, रोज प्या गाजराचा हा ज्यूस

Shocking : सेक्स रॅकेट चालवणाऱ्या अभिनेत्रीला ठाण्यात अटक, ज्युनिअर कलाकारांना फसवायची अन्..

Gold Price: इराण युद्धाचा परिणाम! सोनं-चांदीला चकाकी, २४ तासांत सोनं ११००० तर चांदी २५००० रुपयांनी वाढले

SCROLL FOR NEXT