Petrol Diesel Price Today, Inflation news in Marathi, Petrol Diesel Rate  Saam TV
देश विदेश

Petrol-Diesel Prices : कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घट; पेट्रोल डिझेल स्वस्त की महाग? पाहा आजचा भाव

भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crud Oil) दरात चढ-उतार होत आहे. काही दिवसांपूर्वी प्रतिबॅरेल 140 डॉलरवर गेलेल्या कच्च्या तेलाच्या किंमती आता 106 डॉलरवर आल्या आहेत. पेट्रोल डिझेलचे (Petrol-Diesel) दर हे कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून असतात. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. (Petrol Diesel Latest Price Today)

कच्च्या तेलाची किंमत सध्या प्रतिबॅरेल 106 डॉलर इतकी आहे. मात्र आजही सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात आजही कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 95.84 रुपयांनी विकलं जातंय. 6 एप्रिलपासून कंपन्यांनी त्याच्या किमती वाढवल्या नाहीत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रतिबॅरेल 140 डॉलरवर गेल्या होत्या तेव्हाही पेट्रोल डिझेलच्या किमतीत बदल करण्यात आला नव्हता. सोमवारी सकाळी जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 107.3 डॉलर होती, जी आज 105.9 डॉलरवर घसरली आहे. (Petrol Diesel Price Today)

4 प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई - मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 95.84 रुपयांनी विकलं जातंय.

दिल्ली - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.

चेन्नई - चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.

कोलकाता - कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये इतका आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Ajit Pawar Death : अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय, बारामतीमधील 'हे' गाव बंद राहणार

Kandyache Muthe Recipe : कांद्याचे मुठे अन् गरमागरम भाकरी; रविवारचा गावरान बेत, वाचा सिंपल रेसिपी

Bigg Boss Marathi 6 : विजेतेपदाच्या शर्यतीतून 'हा' दावेदार बाहेर; बिग बॉसमध्ये शॉकिंग एलिमिनेशन, नाव वाचताच बसेल मोठा धक्का

Maharashtra weather update : थंडी ओसरली! राज्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT