Peru Alien Attacks Saam Tv
देश विदेश

Peru Alien Attacks: पृथ्वीवर अवतरला 7 फूटांचा एलियन?, गावकऱ्यांवर केला हल्ला; पण...

Alien Attacks News: या एलियन्समुळे या गावामध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Priya More

Alien Latest News: एलियन्स (Alien) पृथ्वीवर अवतरल्याची घटना समोर आली आहे. पेरुमधील एका गावामध्ये या एलियन्सने नागरिकांवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. काहींना हे एलियन्स असल्याचे वाटत आहे. तर काहींनी एलियन्स असल्याची अफवा असल्याचे मत व्यक्त केले आहे. हा एलियन सात फुट उंचीचा असून त्याच्यावर कितीही गोळ्या झाडल्या तरी त्याला काहीच होत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या एलियन्समुळे या गावामध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

एलियन्सबद्दल सध्या पेरुमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. आता जगभरातही या एलियन्सविषयी चर्चा असून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. काही लोकांनी या एलियन्सची तुलना स्थानिक अंधश्रद्धेशीही केली. पोलीस अधिकाऱ्यांना संशय आहे की, बेकायदेशीर सोन्याचे उत्खननशी संबंधित गुन्ह्याशिवाय काहीच नाही. त्यांनी दावा केला आहे की, एलियन्स साधारणता ब्राझीलच्या 'ओ प्राइमरो कोमांडो द कॅपिटल', कोलंबियाच्या 'क्लॅन डेल गॉल्फो', FARC सारख्या ड्रग कार्टेलशी संबंधित माफिया आहेत. तपास करत असलेल्या पेरूच्या राष्ट्रीय अभियोक्ता कार्यालयाने सांगितले की, सोन्याशी संबंधित माफिया या हल्ल्यांसाठी जबाबदार आहेत.

सरकारी वकिलांनी सांगितले की, सोने माफिया दहशत पसरवून पेरूमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक लोकांना त्यांच्या घरात कोंडून ठेवणे आणि बेकायदेशीर सोन्याच्या ठिकाणांपासून या लोकांना दूर ठेवणे हा यामागचा उद्देश आहे. पुढे असे सांगण्यात आले की, बेकायदेशीर खाण माफियांनी पेरूमधील नानय नदीच्या आसपासच्या जंगलात सोने शोधण्यासाठी जेटपॅकचा वापर केला. सरकारी वकिलांनी पुढे सांगितले की, या बेकायदेशीर खाण कार्टेलद्वारे जेटपॅकचा वापर पेरूमधील नानय नदीच्या आसपासच्या जंगलात खोलवर सोने शोधण्यासाठी केला गेला होता.

अल्टो नानेचे इकिटू सदस्य सांगतात की, गावात एलियन्सचे येणं 11 जुलैपासून सुरू झाले. हा एलियन गडद हिरव्या रंगात दिसत असून तो ७ फूटांचा आहे. या एलियनने हल्ला केल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. इकिटूचे नेते जैरो रेतेगुई अविला यांनी सांगितले की, हल्लेखोर मानव नसून एलियन आहेत. त्याच्यावर दोनदा गोळी झाडली. पण तो खाली पडला नाही तर गायब झाला.

त्यांनी पुढे सांगितले की, गावात काय चालले आहे, याची सर्वांनाच भीती वाटते. त्याच वेळी, आणखी एका साक्षीदाराने सांगितले की शाळेतील एका शिक्षकाने जमिनीवरून विचित्र प्राणी उडताना पाहिले. या प्रकरणाचा तपास करणारे सरकारी वकील कार्लोस कॅस्ट्रो क्विंटनिला यांनी सांगितले की, हल्लेखोर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत होते आणि दुसरे काहीही नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

No salt diet: सलग 15 दिवस मीठ खाल्लं नाही तर काय होईल, जाणून घ्या

IPL 2026: मुंबईचा शेवटचा सामनाही देवाला, राजस्थानची प्लेऑफमध्ये रॉयल एन्ट्री, पंजाब-कोलकात्याचा खेळ खल्लास

Maharashtra News Live Update: चांदवड-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; वाहन उलटून २१ मजूर जखमी

Fitness Influencer Death: फिटनेस इन्फ्लुएंसरचे वयाच्या 22 व्या वर्षी निधन; चाहत्यांना बसला मोठा धक्का

नदीत पात्रात अचानक पाणी वाढले; बोटीने शिंपले गोळा करायला गेलेल्या ८ जणांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT