SpiceJet Flight Viral Video  ANI
देश विदेश

Viral Video : विमानात हवाईसुंदरीसोबत प्रवाशाचे गैरवर्तन; धक्कादायक व्हिडीओ आला समोर

दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या प्रवासी विमानात एका प्रवाशाने हवाईसुंदरीसोबत गैरवर्तन केलं आहे.

Shivaji Kale

Viral Video : एअर इंडिया विमानात एक मद्यधुंद व्यक्तीने महिलेवर लघुशंका केल्याचा प्रकार ताजा असताना, दिल्लीतून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या प्रवासी विमानात एका प्रवाशाने हवाईसुंदरीसोबत गैरवर्तन केलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. (Breaking Marathi News)

नेमकं काय घडलं?

दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या स्पाईसजेट विमानात ड्यूटीवर असलेल्या एका हवाईसुंदरीसोबत प्रवाशाने हुज्जत घातली. इतकंच नाही तर त्याने अर्वाच भाषेत हवाई सुंदरीला शिवीगाळही केली. विमानातील हा व्हिडीओ (Viral Video) एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवर शेअर केला आहे.

ही संतापजनक घटना आज म्हणजेच सोमवारी घडली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक ज्येष्ठ व्यक्ती हवाईसुंदरीसोबत हुज्जत घालताना दिसून येत आहे. यादरम्यान, विमानातील काही प्रवासी त्याला आवरण्याचा प्रयत्न करीत आहेत. (Latest Marathi News)

तरी सुद्धा हा ज्येष्ठ व्यक्ती हवाईसुंदरीला अर्वाच्च भाषेत बोलत आहेत. दरम्यान, वाद घालणाऱ्या या प्रवाशाला आणि त्याच्या साथीदाराला सुरक्षारक्षकांच्या ताब्यात देण्यात आलं. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला.

विमान प्रवाशांनी हवाईसुंदरीसोबत हुज्जत घालण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील इंडिगोच्या इस्तंबूल-दिल्ली फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने हवाईसुंदरीसोबत गैरवर्तणूक केली होती. तसेच एअर इंडिया विमानात एक मद्यधुंद व्यक्तीने महिलेवर लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला होता.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: कर्ज घेण्यापूर्वी चाणक्यांचे हे 3 नियम जाणून घ्या; वाद आणि आर्थिक संकट टळेल

Maharashtra Live News Update : प्रचारादरम्यान पैसे वाटले, डोंबिवलीत धक्कादायक प्रकार

Crime News : 'मला माझ्या नवऱ्यासोबत झोपायला भीती वाटते'...; पत्नीची तक्रार, पोलीस बेडरूममध्ये घुसले अन्... नेमकं काय घडलं?

Unique Mangalsutra Designs: मंगळसूत्राचे 5 युनिक डिझाईन्स, साडी आणि ड्रेसवर उठून दिसतील

Crime News: रात्री आईवडिलांना झोपेच्या गोळ्या द्यायची, नंतर बॉयफ्रेंडसोबत...; आठवीच्या विद्यार्थिनीचा धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT