PM Narendra Modi Latest Speech Saam TV
देश विदेश

PM Narendra Modi Speech: 'खोटं पसरवणाऱ्यांना सत्य ऐकू येत नाही', विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर PM मोदींचा टोला

Parliament Session 2024 Live Updates: राज्यसभेत पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू असताना विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. यावरुनही पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून टीका केली.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. ३ जुलै २०२४

लोकसभा निवडणुकांतर होत असलेल्या पहिल्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. काल लोकसभेत विरोधकांवर निशाणा साधल्यानंतर आज राज्यसभेतही पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना त्यांनी संविधान हीच मोठी प्रेरणा असल्याचे सांगत विरोधकांवर तोफ डागली.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

"भारताच्या संसदीय लोकशाहीत अनेक दशकांनंतर जनतेने सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली. 10 वर्षे सत्तेत राहून पुन्हा सरकार येण्याचा योग 60 वर्षांनंतर आला आहे. ही काही सामान्य गोष्ट नाही. जनतेने दिलेल्या या निर्णयाला काही लोकांनी जाणीवपूर्वक कलंकित करण्याचा प्रयत्न केला," असा टोला पंतप्रधान मोदी यांनी लगावला.

तसेच "मला काही काँग्रेस सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत. निकाल आल्यापासून आमचे सहकारी एक तृतीयांश सरकार स्थापन होईल, असे वारंवार सांगत होते. आम्हाला 10 वर्षे उलटून गेली आणि अजून 20 बाकी आहेत, यापेक्षा मोठे सत्य काय असू शकते. एक तृतीयांश झाले. अजून दोन तृतीयांश बाकी आहेत," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान, राज्यसभेत पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू असताना विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. यावरुनही पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून टीका केली. मैदान सोडणेच त्यांच्या नशिबात आहे. या लोकांना सत्य पचवता येत नाही. याच कारणामुळे ते मैदान सोडून पळून जात आहेत. मी माझ्या कर्तव्याशी संलग्न आहे. मला प्रत्येक क्षणाचा हिशोब देशवासियांना द्यायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT