Eiffel Tower Bomb Threat Saam Tv
देश विदेश

Latest International News Today: पॅरीसमधील जगप्रसिद्ध 'आयफेल टॉवर' बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस हाय अलर्टवर

Eiffel Tower Bomb Threat: पॅरीसमधील जगप्रसिद्ध 'आयफेल टॉवर' बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस हाय अलर्टवर

Satish Kengar

Eiffel Tower Bomb Threat: पॅरीसमधील जगप्रसिद्ध 'आयफेल टॉवर' बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याची बातमी समोर येत आहे. ही धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी येथून पर्यटकांना बाहेर जाण्यास सांगितलं असून संपूर्ण टॉपवर रिकामा करण्यात आला आहे.

पॅरिस पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, जगातील सर्वाधिक भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या पॅरिसमधील आयफेल टॉवरवर बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, धमकी मिळाल्यानंतर खबरदारी म्हणून आयफेल टॉवर रिकामा करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी ते जनतेसाठी बंद ठेवण्यात आले होते.

पॅरिसच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आयफेल टॉवरचे तीन मजले रिकामे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. पोलिसांच्या अनेक तुकड्याही घटनास्थळी तैनात आहेत. आयफेल टॉवरच्या आजूबाजूलाही बॉम्बचा शोध सुरू आहे. पोलिसांनी येथे बॅरिकेडिंगही केली आहे. तसेच पर्यटकांना टॉवरपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे.  (Latest Marathi News)

स्थानिक पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, शनिवारी दुपारी 1:30 वाजता बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यानंतर लगेचच तिन्ही मजले आणि टॉवरच्या खाली असलेल्या प्लाझामधून पर्यटकांना दूर राहण्यास सांगण्यात आले.

आयफेल टॉवरच्या सुरक्षेबद्दल बोलायचे झाले तर टॉवरच्या दक्षिण खांबावर एक पोलीस ठाणे आहे. जिथे मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत. संकुलात प्रवेश करण्यापूर्वी पर्यटकांना कडक सुरक्षा निगराणीतून जावे लागते. तपासादरम्यान, पोलिसांना पर्यटकांना व्हिडीओ देखरेखीतून जावे लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT