Amit Shah News  Saamtv
देश विदेश

Amit Shah News: राजद्रोह कायदा रद्द करणार.. गृहमंत्री अमित शहांची मोठी घोषणा; लोकसभेत CrPC दुरुस्ती विधेयक सादर

Centre Introduce Three Bills in Lok Sabha: ब्रिटीशांनी केलेल्या फौजदारी कायद्यांसंबंधी फेरबदल करण्यात आले आहेत.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, प्रतिनिधी...

Parliament Monsson Session: लोकसभेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आजच्या कामकाजात अमित शहा यांनी एक विधेयक मांडले. ज्यामध्ये ब्रिटीशांनी केलेल्या फौजदारी कायद्यांसंबंधी फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत. या विधेयकानुसार भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यांची जागा भारतीय न्यायिक संहितेने घेतली जाईल.

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत CrPC दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले आहे. भारतीय दंड संहिता, सीआरपीसी आणि भारतीय पुरावा कायद्यात सुधारणा करण्यासंदर्भातील ही तिनही विधेयके आहेत. यावेळी अमित शहा यांनी राजद्रोहाचा कायदा रद्द करणार असल्याची मोठी घोषणा केली.

गेल्या अनेक दशकांपासून या कायद्याबाबत बराच वाद झाला होता. अनेक विरोधी पक्षांनी या कायद्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत तो रद्द करण्याची मागणी केली होती. गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत तिन्ही विधेयके सादर केली. त्यानंतर ही तिन्ही विधेयके गृहमंत्रालयाच्या स्थायी समितीकडे पाठवण्यात आली आहेत.

यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की, "गुलामगिरीच्या खुणा नष्ट करुन नवा कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. उशिरा न्याय मिळत असल्याने लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडत चालला आहे. त्यामुळेच संपूर्ण कायदा व सुव्यवस्था बदलली जात आहे."

या कायद्यात बदल होणार...

भारतीय न्याय संहिता, २०२३- गुन्ह्यांशी संबंधित आणि त्याच्याशी संबंधित किंवा आनुषंगिक बाबींसाठी तरतुदी एकत्र करणे आणि त्यात सुधारणा करणे.

भारतीय नागरी संरक्षण संहिता, २०२३ - फौजदारी प्रक्रियेशी संबंधित कायद्याचे एकत्रीकरण आणि सुधारणा आणि त्याच्याशी संबंधित किंवा आनुषंगिक बाबींसाठी.

भारतीय पुरावा विधेयक, २०२३ - निष्पक्ष खटल्यासाठी पुराव्याचे सामान्य नियम आणि तत्त्वे एकत्रित करणे आणि प्रदान करणे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jennifer Winget: १२ वर्षांपूर्वी मोडलं पहिलं लग्न, आता सिंगापूरच्या उद्योगपतीसोबत दुसऱ्यांदा संसार थाटणार ही फेमस अभिनेत्री

Famous Singer Death : प्रसिद्ध गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, संगीत विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

Daily cumin water benefits: जिऱ्याचं पाणी प्यायल्याने खरंच पचनक्रिया सुधारते? डॉक्टरांनी सांगितलं सत्य

मोठी बातमी! बड्या नेत्याला नेपाळ बॉर्डवर अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT